बातम्या

जि.प.शाळा कोदवली नं २ चा अमॄतमहोत्सवी सोहळाउत्साहात साजरा होणार..

ग्रामविकास सेवा संस्था, मांडवकरवाडी व ग्रामस्थांतर्फे कार्यक्रमांचे भव्य आयोजन

राजापूर – (प्रमोद तरळ) तालुक्यातील मौजे कोदवली मांडवकरवाडी येथील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा नं २ या शाळेचे यंदाचे रौप्यमहोत्सवी वर्ष असून ग्रामविकास सेवा संस्था मांडवकरवाडी यांच्या वतीने दि. १७ मे २०२३ रोजी भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे
बुधवार दि १७ मे रोजी स. १० वा. प्रथम सत्रात कार्यक्रमाचे उद्घाटन,स. १० ते १२ ज्येष्ठ माजी विद्यार्थी,माजी मुख्याध्यापक, शिक्षक यांचा सत्कार,आणि मान्यवरांचे मनोगत,दु. १२.३० ते १.३० या वेळेत “समन्वयातून ग्रामविकास”,यावर मा. दिलीप गोखले यांचे व्याख्यान होणार आहे दु. २.३० ते ३.३० भोजन समारंभ, दुसऱ्या सत्रात सायं ४.३० ते महिला मेळावा, हळदीकुंकू समारंभ, व्याख्यान “महिला सक्षमीकरण”, व्याख्यात्या सन्मा. सौ दिपाली पंडित- नायब तहसीलदार, राजापूर, सायं ४.३० ते ६ विद्यार्थ्यांसाठी चित्रकला व नंतर स्पर्धा, तिसऱ्या सत्रात ‌रा. ९ वा. मा.जगदीशजी पवार – अध्यक्ष माय राजापूर, ॲड यशवंत कावतकर – कायदेविषयक सल्लागार ग्रा. से.सं.मांडवकर वाडी यांच्या उपस्थितीत विद्यार्थी गुणगौरव व वाडीतील जेष्ठ शाहीरांचा सत्कार सोहळा संपन्न होणार आहे.रा. १० वा.आजी-माजी विद्यार्थी कोदवली शाळा नं २ च्यावतीने विविध गुणदर्शन कार्यक्रम होतील
सदर कार्यक्रमाचे उद्घाटन मा. श्री गणपत रा. मांडवकर – समाजसेवक आणि जेष्ठ माजी विद्यार्थी कोदवली शाळा नं २ यांच्या हस्ते होणार आहे सन्मा.पाहुणे म्हणून आमदार डॉ श्री राजनजी साळवी उपस्थित राहणार आहेत तर सन्मा. अविनाशजी लाड – माजी उपमहापौर न.मु. महानगर पालिका यांची विशेष उपस्थिती लाभणार आहे या कार्यक्रमाला मा.सुहास पंडित (गटविकास अधिकारी पं.सं राजापूर), मा. विलास गुरव (सरपंच – ग्रुप ग्रामपंचायत कोदवली), मा. सखाराम कडू (गटशिक्षणाधिकारी पं सं राजापूर), मा. सौ सोनम बावकर (जि.प. सदस्या कोदवली), मा. सुभाष गुरव (पन्हं सदस्य,कोदवली), मा. प्रकाश पाध्ये (शिक्षण विस्तार अधिकारी पं.सं राजापूर), मा. रमेश गोडांबे (माजी सरपंच तथा ग्रा. पं. सदस्य कोदवली),मा.सौ. दर्शना मांडवकर (ग्रा. स. कोदवली), श्री शांताराम हि मांडवकर (खजिनदार ग्रा. से. संस्था मांडवकर वाडी – ग्रामीण) आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत या रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त होणाऱ्या विविध कार्यक्रमांना सर्व नागरिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन श्री प्रकाश के. मांडवकर – अध्यक्ष, श्री विलास धों पळसमकर – सचिव यांनी ग्रा. से. संस्था, मांडवकर वाडी,कोदवली, ग्रामस्थ आणि शिक्षक वॄंद कोदवली शाळा नं २ यांच्या वतीने केले आहे. दखल न्यूज महाराष्ट्र

जाहिरात…

What's your reaction?

Related Posts

1 of 291

Leave A Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!