चिपळूण (ओंकार रेळेकर) फेडरेशन ऑफ रत्नागिरी डिस्ट्रिक्ट चेंबर ऑफ कॉमर्स ऍण्ड इंडस्ट्रीज या उद्योजकांनी स्थापन केलेल्या जिल्हा फेडरेशनच्या वतीने ”रत्नागिरी जिल्हा उद्योजक” पुरस्काराचे रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री ना.उदय सामंत यांचे हस्ते नुकतेच वितरण करण्यात आले. यावेळी महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स ॲण्ड इंडस्ट्रीजचे अध्यक्ष ललित गांधी, जेष्ठ पत्रकार उदय निरगुडकर तसेच इतर मान्यवर उपस्थित होते.
यामध्ये चिपळूण बाजारपेठेतील प्रसिद्ध बेकरी प्रॉडक्सचे व्यावसायिक क्वालिटी बेकर्सचे मोहन नायर तसेच विजयीस्वप्न इन्फोटेक कंपनीचे चेअरमन स्वप्निल चिले यांचा तसेच अभिषेक इंटरप्राईजेसचे पंढरीनाथ किर्वे समावेश आहे. बँकेचे वतीने पुरस्कार प्राप्त सर्व उद्योजकांचे अभिनंदन करणेत आले. यानिमित्ताने जिल्ह्यातील उद्योजकांना सन्मानित करून कोकणातील उद्योगाला प्रोत्साहन मिळाले आहे असे मत दि चिपळूण अर्बन बँकेचे अध्यक्ष निहार गुढेकर यांनी व्यक्त केले.
फोटो : मोहन नायर यांचा सत्कार करताना चिपळूण अर्बन बँक अध्यक्ष निहार गुढेकर आणि संचालक छायाचित्रात दिसत आहेत (छाया : ओंकार रेळेकर) दखल न्यूज महाराष्ट्र

