चिपळूण – (प्रमोद तरळ) रविवार दिनांक २८ मे, २०२३ रोजी सेवा सहयोग फाउंडेशनच्या वतीने जय भवानी एज्युकेशन सोसायटीच्या सुमन विद्यालय, टेरव येथील प्रशालेच्या इयत्ता आठवी ते दहावीच्या १०१ विद्यार्थ्यांकरिता प्रत्येकी दफ्तर, कंपास पेटी, आलेख वही, सविधांनाचे पुस्तक व ९ लाँग नोटबुक आदी शालेय साहित्य भेट देण्यात येणार आहे.
सदरचे साहित्य मुंबईतील सरस्वती कोचिंग क्लासेसच्या विनंती नुसार सेवा सहयोग फाउंडेशनच्या वतीने ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना देण्यात आले असून लवकरच हे साहित्य सरस्वती कोचिंग क्लासेसच्या वतीने टेरव हायस्कूलला पाठविण्यात येणार आहे तदनंतर त्वरीत फाउंडेशनच्या वतीने मोफत वितरण केले जाणार आहे सेवा सहयोग फाउंडेशनने केलेल्या सहकार्याबद्दल टेरव ग्रामस्थ, सरस्वती कोचिंग क्लासेस आदींच्या वतीने फाउंडेशनचे मनस्वी आभार मानण्यात आले आहेत. दखल न्यूज महाराष्ट्र.

