खेड – (प्रमोद तरळ) खरा तो एकचि धर्म,जगाला प्रेम अर्पावे,
जगी जे हीन अति पतित,
जगी जे दीन पददलित, तयाला जाऊन उठवावे..
पूज्य साने गुरुजींच्या या काव्यपंक्ती खेड तालुक्यातील चोरवणे गावचे सुपुत्र समाजसेवक, पत्रकार,लेखक,कवी क्रिकेट समालोचक, सुत्रसंचालक श्री.सुदर्शन शांताराम जाधव यांना तंतोतंत लागू पडतात “जिथे कमी,तिथे आम्ही” या उक्तीप्रमाणे ‘देह चंदनापरी झिजावा, घडो मज ऐसी लोकसेवा,
ज्या मातीत जन्माला आलो त्या भूमीच्या ऋणातून उतराई होणे हे कदापि शक्य नाही तरीही आपल्या हातून उपेक्षित, वंचित घटकांची सेवा घडायला हवी या भावनेने झपाटलेला अवलिया अशी समाजसेवक सुदर्शन जाधव यांची ओळख आहे
जाधव हे जातिवंत कवी असून नवाकाळ वर्तमान पत्रात कोरोनावर मात करा, अनाथ
जगणं राहून गेले,
सूर्योदय, दोष कोणाचा
वर्दीतला माणूस, माझ्या कोकणात अस का घडतंय, हरवलेले गावपण,
स्वातंत्र्य नंतरची ७५ वर्षे अशा अनेक कविता प्रसिद्ध झाल्या आहेत. त्याशिवाय जिथे पिकते तिथे विकत नाही, बाप
त्यांच्या “बाप” या लेखनाला सन्मान साहित्याचा महाराष्ट्र राज्य ग्रुप आयोजित काव्यलेखन स्पर्धेत “प्रथम क्रमांक” मिळाला आहे.
काव्य चारोळी ग्रुप कडून विशेष सन्मान करण्यात आला आहे.आई, माणूसकी, राग अश्रुंचे ते चिपळूण (महापूरावर आधारीत लेख) असे अनेक विषयांवरील विविधांगी लेखन प्रसिद्ध आहे
. जाधव हे जल फाऊंडेशन कोकण विभाग (रजि) – उपसचिव, खेड तालूका रहिवासी मंच मुंबई -सभासद, खेड तालुका कोकण रहिवासी मंच दिवा, झेप प्रतिष्ठान महाराष्ट्र-सभासद वसई सावंतवाडी रेल्वे प्रवासी संघटना -सभासद,
स्वराज्याचे शिलेदार प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य-मुंबई प्रमूख(गड किल्ले स्वच्छता आणि गड संवर्धन) आदी संघटनातून ते कार्यरत आहेत
दि. २२ जुलै २०२१ रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे कोकणात अनेक ठिकाणी दरड कोसळली.अनेक गावांना त्याचा फटका बसला. अशा परिस्थितीत अनेक संस्थाच्या माध्यमातून अन्नधान्य किट उपलब्ध करून दिले. जवळजवळ ८ ते ९ अन्नधान्य किट गाड्या गावापर्यंत पोचवल्या. या महत्वपूर्ण काम सुदर्शन जाधव यांनी बजावले.
पाणी समस्या दूर करण्यासाठी सुदर्शन जाधव कायम प्रयत्न करत असतात.घरडा केमिकल कंपनी कडून ५००० लिटर ची टाकी आणि ५०० मीटर पाईप अनेक गावांना त्यांनी मिळवून दिले आहे.पत्रव्यवहार पासून ते गावोगावी टाक्या पोचेपर्यत पाठपुरावा करत असतात.जल फाउंडेशन कोकण विभाग संस्थेचे सल्लागार श्री वसंत मोरे साहेब यांची त्यांना साथ लाभली आहे. गावोगावी टाक्या घरडा केमिकल कंपनी च्या माध्यमातून पोचत आहेत.कंपनीचे अधिकारी निमसे साहेब आणि घोरपडे साहेब यांचे विशेष असे सहकार्य लाभले. आतापर्यंत अनेक गावांना टाक्या आणि पाईप उपलब्ध करून दिले आहे.गुहागर तालुक्यातील कारूळ गावाची पाणी समस्या खूप मोठी होती.ती सुदर्शन जाधव यांच्या मार्गदर्शनामुळे पाणी समस्या दूर झाली.५००० लिटरच्या ४ टाक्या आणि ११०० मीटर पाईप आणि मोटर उपलब्ध करून दिली.
जल फाऊंडेशनचे सभासद ते उपसचिव असा प्रवास असून जल फाऊंडेशनच्या प्रत्येक उपक्रमात भाग घेणारे व्यक्तिमहत्व म्हणजे सुदर्शन जाधव.१ मे २०१९ रोजी चोरवणे जखमीची वाडी प्रोजेक्ट मध्ये सहभागी.तीवरे धरणग्रस्त लोकांना मदत उपक्रमात सहभागी.जल फाऊंडेशन चे सभासद वाढीसाठी महत्वपूर्ण भूमिका बजावत आहेत.
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून देण्यात त्यांचा नेहमीच पुढाकार असून सन २०२१ मध्ये खेड तालुका रहिवासी मंच मुंबई या मंडळाच्या माध्यमातून १५ गावातील काही शाळांमधील १२० विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून दिले.झेप प्रतिष्ठानच्या माध्यमातून अर्थिक परिस्थिती बरोबर नसलेल्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य उपलब्ध करत देत असतात.२०२२ मध्ये दिवा नगरीत शक्ती तुऱ्याचा कार्यक्रम आयोजित करून त्यातुन मिळालेल्या पैशातुन ७४ विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून दिले.लांजा तालुक्यातील कोरोना मध्ये आईवडील गमावलेल्या दोन विद्यार्थ्यांना ४००० रोख रक्कम आणि स्कुल बॅग दिल्या.यंदा ही झेप प्रतिष्ठानच्या माध्यमातून आतापर्यंत ४ विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून त्यांनी दिले आहे.
सामाजिक कामाची दखल घेत अनेक संस्थाकडून सुदर्शन जाधव यांना सन्मानित करण्यात आले आहे.तसेच ओम साई नाच मंडळ अंबरनाथ यांच्या कडून २६ फेब्रुवारी २०२२ रोजी “समाजसेवारत्न पुरस्कार” प्राप्त झाला आहे. सुदर्शन जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक संघटना, स्वयंसेवी संस्था, ग्राम मंडळे यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. दखल न्यूज महाराष्ट्र
