झेप प्रतिष्ठानतर्फे दिनांक १७ जून २३ रोजी जिल्हा परिषद शाळा साले,तालुका माणगाव जिल्हा रायगड येथील जीर्ण झालेल्या शाळेला संजीवनी देऊन शाळेचे नूतनीकरण करण्यात आले.तसेच मुलांना शैक्षणिक साहित्य जसे वह्या,बॅग,पेन,पाण्याची बाटली, चित्रकला वह्या,रंगपेटी इत्यादी साहित्य देण्यात आले आणि या शाळेचे संपूर्ण रंगकाम करून प्राथमिक शाळेतील मुलांसाठी बोलकी शाळा बनवून देण्यात आली.आज जिल्हा परिषद शाळांना जर मोठमोठ्या इंग्रजी माध्यमातील शाळांशी स्पर्धा करायची असेल तर मुलांना शिक्षणासोबत मोकळं वातावरण, स्वच्छ शाळा आणि रंगीत वर्गखोल्या यावर भर देणं गरजेचं आहे.याचीच गरज लक्षात घेऊन झेप प्रतिष्ठानचे योगेश खाकम यांच्याशी शाळा व्यवस्थापन आणि ग्रामस्थांनी संपर्क साधला आणि त्यानंतर झेप प्रतिष्ठानने शाळेचे नूतनीकरण करण्यासाठी त्यांच्या संपूर्ण टीम सोबत पुढाकार घेतला.त्यासोबतच शहरात राहून गावाशी नाळ जपून ठेवणारे गावातील काही तरुणांनी ही या उपक्रमासाठी मोठी मदत केली.याचप्रकारे प्रत्येक गावातील शहरात स्थायिक झालेल्या तरुणांनी पुढाकार घेतल्यास महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्हा परिषद तसेच मराठी माध्यमाच्या शाळा मुलांसाठी सर्वोत्तम शाळा बनू शकतील असा विश्वास झेप प्रतिष्ठानचे अध्यक्ष विकास धनवडे यांनी व्यक्त केला.झेप प्रतिष्ठान तर्फे याआधी कर्जत मधील एका शाळेचे नूतनीकरण करून दिले होते.मुलांना शिक्षणाची गोडी निर्माण व्हावी तसेच शिक्षकांना ही चांगल्या वातावरणात मुलांना शिकवणे सोपे जावे म्हणून याप्रकारचे प्रकल्प झेप प्रतिष्ठान तर्फे वर्षभर राबवले जातात. त्यासोबतच गेल्या तीन वर्षात प्रमाणेच याही वर्षी जवळपास 2000 पेक्षा ही जास्त विद्यार्थांना शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून देण्यात येणार आहे अशी माहिती विकास धनवडे यांनी दिली.या नवीन शाळेचे उद्घाटन करण्यासाठी आज झेप प्रतिष्ठानतर्फे संदीप गोळे आणि योगेश खाकम यांनी उपस्थिती लावत शाळेतील शिक्षक आणि मुलांशी संवाद साधला.या प्रसंगी शालेय शिक्षण समितीचे सदस्य,शाळा मुख्याध्यापक,शिक्षक वर्ग आणि समस्त ग्रामस्थ उपस्थित होते. दखल न्यूज महाराष्ट्र
