रत्नागिरी मधील होत असलेल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामधील फर्निचरसाठी वापरण्यात येणाऱ्या सामानाबाबत शंका आढळल्याचे रत्नागिरी मनसे कार्यकर्त्यांना कळताच त्यांनी दिनांक 3 सप्टेंबर 2023 रोजी प्रत्यक्ष स्थळी जाऊन पाहणी केली असता ते सामान हलक्या दर्जाचे असल्याचे आढळून आले. तसेच फर्निचर चे काम हे अंदाज पत्रक प्रमाणे होताना दिसत नाही, म्हणून त्याची सखोल चौकशी व्हावी व त्या कंत्राटदारांची बिले योग्य ती चौकशी आणि खात्री केल्यानंतरच मोकळी करण्याचा निर्णय घ्यावा . उद्घाटनाची कोणतीही घाई करून निकृष्ट दर्जाच्या बांधकामाला पाठिंबा देऊ नये, असे मनसे रस्ते आस्थापना-जिल्हा संघटक अजिंक्य केसरकर यांनी सा. बां. रत्नागिरी कार्यकारी अभियंता यांना पत्र देऊन मागणी केली आहे अन्यथा मनसे रस्ते आस्थापना आंदोलन करेल याला जबाबदार प्रशासन राहील असे त्यांनी सांगितले आहे. दखल न्यूज महाराष्ट्र
