भाजपाची रत्नागिरी तालुक्यात जोरदार इनकमिंग..
रत्नागिरी : रत्नागिरी तालुक्यातील भगवती नगर परिसरातील उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या उपसरपंचासह सहा सदस्यांनी असंख्य कार्यकर्त्यांसह भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला आहे.
भारतीय जनता पार्टीमध्ये सध्या पक्षप्रवेशाची रीग दिसून येत आहे. रत्नागिरी तालुक्यातील भगवती नगर मधील उपसरपंच सौ. श्रेया श्रीकांत राजवाडकर यांच्यासह सेजल पोमेंडकर, प्रसाद प्रकाश शिर्के, दीपक शिवराम नेवरेकर, श्री अनिल वसंत मोहिते, पवित्रा प्रवीण नेवरेकर, यांनी भगवती नगर येथील भाजपा जेष्ठ कार्यकर्ते सतीश सोबळकर, सतीश शेवडे यांच्या नेतृत्वात भारतीय जनता पार्टीचे नेते सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्रजी चव्हाण, जिल्हाध्यक्ष राजेशजी सावंत, श्री. अनिकेतजी पटवर्धन, श्री. राजू मयेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत भारतीय जनता पार्टीमध्ये पक्षप्रवेश केला आहे.
भारतीय जनता पार्टी मध्ये रत्नागिरी जिल्ह्यामध्ये गेल्या काही महिन्यांमध्ये मोठ्या प्रमाणात पक्षप्रवेश झालेला आहे. यामुळे भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळत आहे. दखल न्यूज महाराष्ट्र.
