रत्नागिरी : यावर्षी महाराष्ट्र शासनाने दहीहंडी हा साहसी खेळ म्हणून मान्यता दिली. संपूर्ण महाराष्ट्रात दहीहंडी हा उत्सव प्रचंड उत्साहात साजरा होतो. रत्नागिरी शहरांमध्ये देखील अनेक ठिकाणी दहीहंडी स्पर्धा भरवण्यात आल्या होत्या.
भारतीय जनता पार्टी शहर उपाध्यक्ष श्री नितीन जाधव पुरस्कृत परटवणे मित्र मंडळ आयोजित दहीहंडी स्पर्धा संपन्न झाल्या. या दहीहंडी स्पर्धेमध्ये काळभैरव जोगेश्वरी गोविंदा पथक झाडगाव यांनी ६.३१ सेकंदात पाच थराची सलामी देऊन प्रथम क्रमांक पटकावला.
भाजप नितीन जाधव पुरस्कृत दहीहंडी स्पर्धा या स्पर्धेसाठी एकूण वीस संघाने हजेरी लावली. दहीहंडी निमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सूचनेनुसार राबविण्यात येत असलेल्या ‘मेरी माटी मेरा देश’ या उपक्रमाचे देखील या ठिकाणी आयोजन करण्यात आले होते.
याप्रसंगी आयोजक नितीन जाधव त्याचबरोबर माजी आमदार बाळ माने, जिल्हाध्यक्ष राजेश सावंत, मिहीर माने, दादा ढेकणे, विक्रम जैन, उमेश खंडकर, मंदार खंडकर, संदीप सुर्वे राकेश सुवरे, निलेश मराठे अमित विलनकर व इतर भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. परटवणे मित्र मंडळ यांच्या उपस्थितीत, आणि प्रत्येक सदस्याच्या प्रयत्नाने दहीहंडी कार्यक्रम संपन्न झाला. दखल न्यूज महाराष्ट्र.

