देवरुख : श्री सद्गुरु लोकमान्य वाचनालय देवरुख यांनी आयोजित केलेल्या ३ऱ्या कथालेखन व ६व्या लेख स्पर्धेचा निकाल अध्यक्ष प्रा. श्री. गजानन केशव जोशी यांनी नुकताच जाहीर केला. वाचनालयातर्फे कथालेखन स्पर्धेचे आयोजन निवृत्त सहकारी बँक अधिकारी स्व. सदानंद बेंदरकर आणि शिक्षिका स्व. शालिनी बेंदरकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ केले जाते, तर वाचनालयाचे माजी ग्रंथपाल आणि निवृत्त शिक्षक स्व. लक्ष्मण वामन साने यांच्या स्मृति प्रित्यर्थ खुल्या लेख स्पर्धेचे आयोजन केले जाते. कथालेखन व लेख स्पर्धेचा सविस्तर निकाल खालील प्रमाणे:-
कथालेखन स्पर्धा- प्रथम: श्रद्धा वझे- कल्याण, द्वितीय: शरयू गीते- देवरुख, तृतीय: मंजुश्री भागवत- देवरुख, उत्तेजनार्थ- १.अमित पंडित- कनकाडी साखरपा, २.काशिनाथ आमणे- चिपळूण, ३. राजेश जोशी- सातारा.
लेख स्पर्धा- प्रथम: मोहन अत्रे- काल्हेरी भिवंडी, द्वितीय: शलाका वारेकर- मिरजोळे रत्नागिरी, तृतीय: राखी तोडणकर- दाभोळ रत्नागिरी, उत्तेजनार्थ- १. ऐश्वर्या शिंदे- खोरनीनको लांजा, २. श्रद्धा वझे- कल्याण, ३. स्नेहल चव्हाण- देवरुख.
कथालेखन स्पर्धेचे परीक्षण डॉ. सौ. संध्याताई देशपांडे, चिपळूण यांनी केले, या स्पर्धेत विविध ठिकाणच्या एकूण २३ कथा लेखकांनी सहभाग घेतला होता. तर लेख स्पर्धेचे परीक्षण श्री. नचिकेत भंडारी, विटा यांनी केले, यामध्ये विविध ठिकाणच्या १९ स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. दोन्ही स्पर्धेतील विजेत्यांना प्रथम क्रमांकाचे रुपये ७५०/-, द्वितीय क्रमांकाचे रुपये ५००/- आणि तृतीय क्रमांकासाठी रुपये २५०/- रोख बक्षिसे आणि प्रमाणपत्र दिले जाणार आहे, तर सर्व सहभागी स्पर्धकांना सहभाग प्रमाणपत्र दिले जाणार आहे. लेख स्पर्धेचे संयोजक म्हणून कार्यकारी मंडळ सदस्य ॲड. समीर आठल्ये यांनी, तर कथालेखन स्पर्धेचे संयोजक म्हणून प्रा. किरण देशपांडे यांनी महत्त्वाची जबाबदारी सांभाळली. दोन्ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी ग्रंथपाल श्रद्धा आमडेकर, सहाय्यक ग्रंथपाल अमृता इंदुलकर, अर्चना राणे व नरेंद्र खेडेकर यांनी मेहनत घेतली. श्री सद्गुरू लोकमान्य वाचनालयाच्या कार्यकारी मंडळाने सर्व सहभागी व विजेत्या स्पर्धकांचे अभिनंदन करून धन्यवाद दिले आहेत. या दोन्ही स्पर्धेच्या पारितोषिक वितरण समारंभाचे आयोजन नजीकच्या काळात केले जाणार आहे.
फोटो- दोन्ही स्पर्धेतील प्रथम तीन क्रमांकाच्या यशस्वीतांच्या फोटोंचा कोलाज. दखल न्यूज महाराष्ट्र.

