राजापूर – (प्रमोद तरळ) तालुक्यातील कशेळी येथील युवा ग्रुप वाडीवठार हे मंडळ ८ व्या वर्षात पदार्पण करत आहे, सदर मंडळ प्रत्येक वर्षी नवीन संकल्प करत असते यंदाही सामाजिक बांधिलकी म्हणून गणेशोत्सवामध्ये रत्नागिरी सिव्हिल हॉस्पिटलच्या सहकार्याने गुरुवार दि. २१ सप्टेंबर २०२३ रोजी सकाळी ९.३० ते दुपारी १.३० या वेळेत जाकादेवी मंदिर येथे. भव्य रक्तदान शिबिराचे आयोजित केले आहे. या मंडळाचे द्वितीय वर्ष आहे. ” विसरून जाऊ धर्म, प्रांत, जाती, रक्तदान करुया मानवतेसाठी…!” या उक्तीप्रमाणे मंडळाने पंचक्रोशी कशेळी,आडिवरे,गावखडीपरिसरातील सर्व रक्तदात्यानी या शिबिरात सहभागी होऊन रक्तदान करावे असे आवाहन युवा ग्रुप वाडीवठार (कशेळी) चे अध्यक्ष मंदार डुकळे, उपाध्यक्ष चंदन गुरव,सेक्रेटरी विशाल डुकळे,उपसेक्रेटरी प्रितम डुकळे, खजिनदार वैभव इंदुलकर, उपखजिनदार विराज डुकळे,आणि मंडळाचे सर्व सभासद यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी
९७७३६९५२८५,
९२२०१५१६४४,
आदी भ्रमणध्वनीवर संपर्क साधावा असे आवाहन मंडळाने केले आहे.. दखल न्यूज महाराष्ट्र.
