बातम्या

गोंदिया करमाळी, बल्लारशा मडगाव, चंद्रपूर थिवीम सुरु करण्याची राष्ट्रीय रेल्वे प्रवासी संघटना शेगांव राष्ट्रीय सरचिटणीस वैभव बहुतूले यांची मागणी.

अकोला:-विदर्भातील नागरिकांना कोकणाकडे जाण्यासाठी गोंदिया करमाळी,बल्लारशा मडगाव,चंद्रपूर थिवीम या रेल्वे गाडी नियमित सुरु करण्याची मागणी राष्ट्रीय रेल्वे प्रवासी संघटना शेगांव,रेल्वे प्रवासी सामाजिक संस्था कल्याण सावंतवाडी रेल्वे प्रशासनाकडे केली आहे
केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री मा.श्री.रावसाहेब पाटील दानवे,केंद्रीय रस्ते वाहतूक महामार्ग राजमार्ग परिवहन दळवळणमंत्री नितीन गडकरी यांना पाठवलेल्या निवेदनात म्हटले आहे की,नागपूर येथील महामानव भारतरत्न डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांची दिक्षाभुमी,वर्धा येथील सेवाग्राम आश्रम,चंद्रपूर येथील महाकाली मंदिर,शेगांव भाविकांचे आराध्य दैवत श्री.गजानन महाराज,बुलढाणा जिल्ह्य़ातील सिंधखेड राजा माँ जिजाऊ जन्मस्थळ,अमरावती जिल्ह्य़ामध्ये संत गाडगेबाबा महाराज मोझरी बरोबरच नांदुरा येथील १०५ फुटी हनुमानाची मूर्ती,मूर्तीजापूर कार्तिकस्वामी मंदिरांच्या दर्शनासाठी कोकणातील भाविक भक्त बुलढाणा,अमरावती,वर्धा,चंद्रपूर,गोंदिया परिसरात येत असतात.विदर्भातील मोठ्या संख्येने नागरिक कोकणातील निसर्गरम्य परिसर पाहण्यासाठी येत असतात.गोंदिया-बल्लारशा पासुन करमाळी गोवा/मडगाव गोवा करीता नियमितपणे रेल्वेगाडी सुरु झाल्यास विदर्भातील प्रसिद्ध असलेली नागपुरी संत्री,हल्दीराम गुलाबजाम श्रीखंड आम्रखंड संत्राबर्फी सोनपापडी,शेगांव प्रसिद्ध शेगांव कचोरी याचा स्वाद कोकणवासीयांना कोकणातच घेता येणार आहे.कोकणातील रत्नागिरीचा हापूस आंबा,सिंधुदुर्गचा देवगड हापूस आंबा मालवणी खाजा कडक बुंदी लाडू, सावंतवाडी जिल्ह्य़ातील लाकडी खेळणी,रायगडचा पांढरा कांदा पापड कुरडई लोणची इ. विदर्भातील नागरिकांना आयात-निर्यात केल्याने उद्योगात वृद्धी करण्यासाठी उपयुक्त ठरणार आहे याद्वारे अनेक बेरोजगार तरुणांना रोजगार होऊन रेल्वे विभागाला महसूल प्राप्त होईल.
मध्य रेल्वे प्रशासनाने गोंदिया ते मडगाव,बल्लारशा ते करमाळी,चंद्रपूर ते थिवीम नियमित चालवण्यासाठी मंजुरी दिल्यास विदर्भातील शेतकऱ्यांना त्याचा लाभ मिळू शकेल याप्रमाणे सुशिक्षित बेरोजगारांना ही रोजगार उपलब्ध होईल रेल्वे विभागाला सुद्धा मोठ्या प्रमाणात राजस्व प्राप्त होऊ शकतो या सर्व बाबींचा विचार करून गोंदिया मडगाव,चंद्रपूर थिवीम,बल्लारशा करमाळी रेल्वे प्रशासनाने गणपती,दिपावली,होळी त्योहार तसेच समर स्पेशल रेल्वेसेवा सुरु करावी अशी मागणी राष्ट्रीय रेल्वे प्रवासी संघटना शेगांव अध्यक्ष राजकुमार व्यास,राष्ट्रीय रेल्वे महिला प्रवासी संघटना शेगांव राष्ट्रीय अध्यक्षा सौ.माधुरी शर्मा,प्रवासी संघटना शेगांव-अखिल भारतीय ग्राहक पंचायत शेगांव अध्यक्ष शेखर नागपाल,रेल्वे प्रवासी सामाजिक संस्था कल्याण सावंतवाडी संस्थापक अध्यक्ष श्री.सुनिल उत्तेकर केंद्रीय कोळसा खाण रेल्वे राज्यमंत्री मा.श्री.रावसाहेब पाटील दानवे,केंद्रीय रस्ते वाहतूक महामार्ग राजमार्ग परिवहन दळवळणमंत्री नितीन गडकरी यांच्या केलेल्या निवेदनात नमूद केली आहे. दखल न्यूज महाराष्ट्र.

What's your reaction?

Related Posts

1 of 291

Leave A Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!