विजय शेडमाके
गड,
दि. 27 नोव्हेंबर 2023
आरमोरी :- तालुक्यातील आरमोरी येथील भाजपा युवा मोर्चा जिल्हा महामंत्री भारतजी बावनथडे यांचे लहान बंधू तूकेश शामरावजी बावनथडे यांचे दिं. 25 नोव्हेंबर 2023 ला अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले.
या संबंधितची माहीती सहकार महर्षी प्रकाश साव. पोरेड्डीवार व जिल्हाध्यक्ष प्रशांतजी वाघरे यांना मिळताच यांनी आज दिं 27 नोव्हेंबर 2023 रोज सोमवार ला आरमोरी येथे बावनथडे कुटुंबीयांच्या परिवारांची भेट घेऊन त्यांच्या दुःखात सामील झाले व सांत्वन केले. यावेळी त्यांचे मोठे बंधू रविंद्र बावनथडे, भारत बावनथडे यांना सहकार महर्षी प्रकाश साव. पोरेड्डीवार व जिल्हा अध्यक्ष प्रशांतजी वाघरे यांनी दु:खा मधून सावरण्यास धीर दिला.
यावेळी जिल्हा महामंत्री सदानंदजी कुथे, भाजपा जिल्हा सचिव नंदूभाऊ पेट्टेवार उपस्थित होते. दखल न्यूज महाराष्ट्र.