बातम्या

आमदार गजबे साहेब होणार आदर्श लोकप्रतिनिधी पुरस्काराने सन्मानित.

मुंबईच्या सरपंच परिषदेचा पुढाकार.

विजय शेडमाके
गडचिरोली,२८/११
राज्यातील पाच आदर्श असलेले लोकप्रतिनिधी आमदार,प्रशासकीय सेवेत असलेले पाच उत्तम प्रशासक, लोकनियुक्त दहा सरपंच, पाच ग्रामसेवक तसेच सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेले पाच सामाजिक कार्यकर्ते यांचा सरपंच परिषद मुंबईच्या वतिने ३ डिसेंबर २०२३ रोजी यशदा पुणे येथे यथोचित सन्मान करून त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात येणार आहे.यात आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आमदार कृष्णाजी गजबे साहेब यांचाही समावेश करण्यात आला असल्याने मित्र परिवार, कार्यकर्त्यांकडून अभिनंदनाचा वर्षाव केल्या जात आहे.
उपरोक्त पुरस्कार जनतेचे हित जपण्यासाठी करण्यात आलेल्या उल्लेखनीय कामगीरीची दखल घेऊन देण्यात येत असल्याने व आरमोरी विधानसभा क्षेत्रातील आमदार कृष्णाजी गजबे साहेब यांनी लोकप्रतिनिधी म्हणून बजावलेल्या उल्लेखनीय कामगीरीची दखल घेऊन देण्यात येत असल्याने सर्वच स्तरातून आमदार गजबे साहेबांचा अभिनंदनाचा वर्षाव केल्या जात आहे.आमदार गजबे साहेब यांना यासाठी स्वर्गीय यशवंतराव चव्हाण आदर्श लोकप्रतिनिधी सन्मान या पुरस्काराने सन्मानित केले जाणार असून यासाठी सरपंच परिषदेचे प्रदेशाध्यक्ष दत्ताभाऊ काकडे यांनी आमदार कृष्णाजी गजबे साहेब यांनी होऊ घातलेल्या पुरस्कार वितरण सोहळ्याला उपस्थित राहण्या संदर्भात पत्राद्वारे कळवले आहे. दखल न्यूज महाराष्ट्र.

What's your reaction?

Related Posts

1 of 291

Leave A Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!