प्रतिनिधी : विजय शेडमाके.
गडचिरोली – डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी मोठ्या कष्टाने आणि एकट्याने बनविलेल्या संविधानाने आम्हाला जगण्याचा मार्ग दाखविला त्याचे रक्षण करण्याची जबाबदारी तुम्हा आम्हा सर्वाची आहे. अश्या प्रकारचे विचार रिपब्लिकन पार्टी गडचिरोली चे जिल्हाध्यक्ष प्रा. मुनिश्चर बोरकर यांनी पोटेगांव येथील संविधान कार्यक्रमा प्रसंगी मांडले. भिमज्योती बहुउद्देशिय संस्था पोटेगाव तथा आदिवासी ग्रामसमिती पोटेगांव परिसर च्या सयुक्त विधमाने संविधानाचा कार्यक्रम गोटुल भुमी पोटेगाव येथे प्रा. मुनिश्वर बोरकर यांच्या अध्यक्षतेखाली तर प्रमुख उपस्थिती म्हणून रिपाई जिल्हा चंद्रपूर चे नेते गोपलजी रायपूरे , बामसेफ चे जिल्हाध्यक्ष कान्हेकर सर , सचिव प्रमोद राऊत , रिपाईचे सुरेश कन्नमवार ‘ प.स. सदस्या माल ताताई मडावी ‘ पो. पाटिल कालिदास हिचामी , शिवाजी नरोटे ,राजु पेरगुमवार मुदोली , सरपंच महादेव पदा , कविश्वर झाडे नवरगांव , पो.पा. वामन बांबोळे, आदि उपस्थित होते. याप्रसंगी गोपाल रायपूरे म्हणाले की , जन्मलेल्या बालकापासून ते मरणार्या लोकापर्यंत माणुस म्हणुन जगण्याचा अधिकार संविधानाने दिला. स्वातंत्र्य लढ्यात बिरसा मुंडा ‘ विर बाबुराव सडमाके आदिनी इंग्रजाच्या विरोधात लढा दिला. तर बाबासाहेबानी स्वातंत्र्यानंतर अधिकार दिला म्हणुन माणुस जिवंत असेपर्यत संविधान टिकले पाहीजे.कान्हेकर सर यांनी आदिवासीवर होणार्या अन्याय अत्याचार विषयी विश्वत माहीती दिली .प्रमोद राऊत , मुजमकर आदिची भाषणे झालीत. कार्यकमाचे प्रास्ताविक भाषण ज्ञानेश्वर मुजुमकर संचालन शिवाजी नरोटे तर आभार डॉ. विजय रामटेके यांनी मानले. कार्यक्रमास पोटेगांव परिसरातील बहुसंख्य आदिवासी व बौद्ध बांधव प्रामुख्याने उपस्थित होते. दखल न्यूज महाराष्ट्र.