बातम्या

राजापूर तालुका बौध्दजन संघाचे अध्यक्ष आयु शिवरामजी हरळकर यांच्या हस्ते राजापूरात डॉ बाबासाहेब आंबेडकर भवनचे लोकार्पण.

राजापूर – (प्रमोद तरळ) भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३३ व्या जयंती दिनाचे औचित्य साधून राजापूर येथे राजापूर तालुका बौध्दजन संघाकडून उभारण्यात आलेल्या भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर भवन तसेच डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुर्णाकृती पुतळ्याचे उद्घाटन राजापूर तालुका बौध्दजन संघाचे अध्यक्ष आयु.शिवरामजी हरळकर यांच्या हस्ते मुंबई व ग्रामीण बांधवांच्या उपस्थितीत करण्यात आले.
अंदाजे साडेतीन लाख रुपये खर्चून बांधलेल्या भव्य भवनात प्रशस्त सभागृह, सुसज्ज काॅनफरन्स हाॅल, अभ्यागतांच्या निवासाची व्यवस्था, तळमजल्यावर व्यवसायिक गाळे आदी सुविधांसह डॉ बाबासाहेब आंबेडकर भवन उभारले गेले आहे.
सकाळी धम्म ध्वजा रोहन झाल्यानंतर डॉ बाबासाहेब आंबेडकर भवन उद्घाटन व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुर्णाकृती पुतळ्याचे अनावरण मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडले त्यानंतर बुध्द पूजापाठ व धम्मदेसना पूज्य भन्तें डॉ खेमधम्मो महाथेरों यांच्या हस्ते होऊन जाहीर सभा झाली यावेळी डॉ महाथेरो यांनी मार्गदर्शन केले
राजापूर बौध्दजन संघ ही १२० गाव संघटन असलेला संघ असून राजापूर तालुका बौध्दजन मुंबईचे अध्यक्ष शिवराम हरळकर, ग्रामीणचे अध्यक्ष महादेव गोठणकर समाजसेवक प्रकाश जाधव (पन्हळेकर) सेवानिवृत्त उपजिल्हाधिकारी नंदकुमार जाधव, अर्बनचे संचालक किशोर जाधव आदी मान्यवरांसह मुंबई व ग्रामीण संघाचे सर्व पदाधिकारी तसेच समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

What's your reaction?

Related Posts

1 of 291

Leave A Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!