खेड:- (प्रमोद तरळ) तालुक्यातील मौजे पन्हाळजे येथील श्री कोंडवाडी हनुमान मंडळ,कोंडवाडी महिला मंडळ आणि जय बजरंग कलापथक यांच्या वतीने सोमवार दि. २२ एप्रिल व २३ एप्रिल २०२४ रोजी ६० वा भव्य हनुमान जन्मोत्सव सोहळा साजरा करण्यात येणार आहे
सोमवार दि. २२ रोजी स. ६ ते ६.३० रोजी हनुमान जन्मोत्सव कलश स्थापना स. ६ ते ८.३० ज्ञानेश्वरी पारायण, सर. ८ ते १२ नामसप्ताह (जगतगुरु नरेंद्राचार्यजी महाराज सांप्रदाय), दु. १२ ते १.३० महाप्रसाद, दु. २ ते५ हळदीकुंकू समारंभ (कोंडवाडी महिला मंडळ), सायं ६ ते ६.३० हरीपाठ, सायं ६.३० ते ८.३० पर्यंत किर्तन हे.भ.प. श्री रवींद्र म. पांचाळ महाराज चिपळूण (वेहेळे), रा. १० ते ११ विद्यार्थी गुणगौरव समारंभ (जय बजरंग बली कलापथक), रा. ११ वा. सांस्कृतिक कार्यक्रम ” स्वर संध्या” तसेच मंगळवार दि. २२ एप्रिल रोजी स. ५ ते ५.३० काकड आरती, सर. ५.३० ते ८ श्री हनुमान जन्मोत्सव, स. ८ ते ९ ‘ श्री ‘ ना अभिषेक, स. ९ ते ११ काल्याचे किर्तन (ह.भ.प. रवींद्र पांचाळ महाराज चिपळूण), दु. १२ ते २ महाप्रसाद, दु ३ ते ७ पालखी मिरवणूक, सायं ७ ते ७.३० सांज आरती, सायं ७.३० ते ९.३० दिंडया कार्यक्रम, रा. १० ते ११ सत्कार समारंभ, ११ ते १२ छबिना आणि रात्री १२ वा. श्री रवळनाथ रिमिक्स नमन मंडळ रत्नागिरी “लयभारी” पौराणिक गण ‘सिंधुरासुराचा वध’ (रंभानॄत्य आणि श्री गणेश वंदना) रसिक प्रेक्षकांचे मनोरंजन करणार आहे सदर कार्यक्रमाला सर्व भाविकांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी असे आवाहन श्री कोंडवाडी हनुमान मंडळ, कार्यकारी मंडळ मुंबई/ पुणे, कार्यकारी मंडळ ग्रामीण तसेच कोंडवाडी महिला मंडळ यांच्या वतीने करण्यात आले आहे