रत्नागिरी:- (प्रमोद तरळ) तालुक्यातील मौजे धामणसे येथील सांबरेवाडी ग्रामस्थ मंडळ आणि श्री हनुमान कला क्रीडा मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवार दि १९ एप्रिल ते २३ एप्रिल २०२४ या कालावधीत भव्य श्री हनुमान जन्मोत्सव साजरा केला जाणार आहे
शुक्रवार दि. १९ रोजी क्रिकेट सामन्याचे उद्घाटन, सोमवार दि २२ रोजी सायं ७.३० वा.आरत्या भोवत्या, रात्री ९ ते १० वा. रौप्य महोत्सव सत्कार समारंभ आणि रात्री १० .३० वाजता श्री हनुमान कला क्रीडा मंडळाच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त धमाल काॅमेडी दोन अंकी नाटक “पती की उचापती” या नाटकाचा प्रयोग सादर केला जाणार आहे.
मंगळवार दि २३ रोजी स.९ वा. सांबरेवाडी ग्रामस्थांचे भजन, स. १० ते २ रक्तदान व मोफत आरोग्य तपासणी शिबिर, स. १०.३० वा. सत्यनारायण महापूजा, दु. १२ ते २.३० महाप्रसाद, दु. ३ वा. हळदीकुंकू समारंभ, सायं ४ वा. क्रिकेटचा अंतिम सोहळा, सायं ५ वा क्रिकेट सामन्याचे बक्षीस वितरण व मान्यवरांचे सत्कार, सायं ७ वा आरत्या भोवत्या, रात्री ९ वा. लकी ड्रॉ आणि रात्री १०.३० वाजता श्री हनुमान नमन मंडळ सांबरेवाडी यांचे ‘बहुरंगी नमन’ होणार आहे सदर कार्यक्रमाला भक्त भाविकांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी असे आवाहन सांबरेवाडी ग्रामस्थ मंडळ आणि महिला मंडळ यांनी केले आहे