बातम्या

कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांच्या वक्तव्याचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी रत्नागिरीतर्फे निषेध..

रत्नागिरी : महाराष्ट्र सरकार मधील कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी खासदार सुप्रियाताई सुळे यांच्याबद्दल शिवराळ भाषेत काढलेल्या उद्गारांचा राज्यभर निषेध व्यक्त करण्यात येत आहे. रत्नागिरीतील अब्दुल सत्तार यांचा राजीनामा तातडीने घेण्याच्या मागणी करता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी रत्नागिरी तर्फे जोरदार निषेध करण्यात आला. मंत्री अब्दुल सत्तार यांची हकालपट्टी करण्यात यावी अशीही मागणी करण्यात आली.
             यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे ज्येष्ठ नेते कुमारजी शेटये, बशीर मूर्तुझा, तालुकाध्यक्ष राजन सुर्वे, शहराध्यक्ष निलेश भोसले, जिल्हा उपाध्यक्ष मिलिंद कीर, जिल्हा सरचिटणीस सचिन कोतवडेकर, सनीफ गव्हाणकर, संकेत कदम संतोष सावंत, शमीम नाईक, नेहाली नागवेकर, कल्पना भिसे, सोनाली मोहिरे,मुनवर मुल्ला फर्जना मस्तान, सानिया दाऊत, शिफा शेख, वफा शेख, सहारा साखरकर, नौशिन काझी, जुबेर काझी, इरफान मस्तान, समीर भोसले,मतीन बावाणी  गिरीश जाधव आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
दखल न्यूज महाराष्ट्र.

What's your reaction?

Related Posts

1 of 297

Leave A Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!