खेड :आगामी नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने मित्रपक्ष म्हणून रिपाई पक्षाला दोन जागा सोडाव्यात अशी मागणी भारतीय जनता पक्षाकडे करण्यात येणार असल्याचे रिपाईचे कोकण प्रदेश संपर्क प्रमुख सुशांत भाई सकपाळ यांनी खेड येथे तालुका कार्यकारिणी बैठकीत सांगितले
आगामी नगरपरिषद व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका रिपाई पक्ष भारतीय जनता पक्ष व बाळासाहेब ठाकरे शिवसेना( शिंदे गट) यांच्या सोबत युती करून लढवणार आहे. त्यामुळे भारतीय जनता पक्षाने खेड नगर परिषद निवडणुकीत एक जागा आणि बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना (शिंदे गट) यांनी एक जागा अशा दोन जागा रिपाई पक्षाला मिळाव्यात व जिल्हा परिषद निवडणुकीत तालुकानिहाय एक जागा तसेच पंचायत समिती चास जागा देण्यात याव्यात अशी ही मागणी खेड तालुका अध्यक्ष संतोष कापसे आणि तालुका कार्यकारिणी यांनी बैठकीत सांगितले
सन २०१४ नंतर भारतीय जनता पक्षाच्या विजयात रिपाई (आठवले )गटाची महत्त्वाची भूमिका बजावली आहे रिपाई पक्षांमुळे दलित बहुजन समाजाची मते भाजपकडे वळू लागली आहेत. त्यामुळे आम्हालाही सत्तेचा वाटा मिळाला पाहिजे पक्षाची सदस्य नोंदणी सुरू तालुका मध्ये जास्तीत जास्त संख्येने क्रियाशील सदस्य नोंदविण्याची जबाबदारी देण्यात आली आहे असे ही सकपाळ यांनी सांगितले जिल्हा तालुका स्थरावर शासन समितीच्या सदस्य पदावर तालुक्यात एक सदस्य आपल्या पक्षाचा सदस्य घ्यावे लवकरच आमदार योगेश दादा कदम यांची तालुका कार्यकारिणी शिष्टमंडळ भेट घेऊन तालुका स्थरिय शासकीय समितीवर नियुक्ती करण्यात यावी तसेच विशेष कार्यकारी अधिकारी निवड. करावी असा वाटा मिळावा पाहिजे असे आमची मागणी आहे असे तालुका अध्यक्ष संतोष कापसे यांनी सांगितले यावेळी जिल्हा कोषाध्यक्ष गौतम तांबे जिल्हा संपर्क प्रमुख गौतम तांबे सवणस्कर तालुका कार्यध्यक्ष मिलिंद तांबे उपाध्यक्ष सखाराम सकपाळ कोषाध्यक्ष गौतम जाधव सरचिटणीस सुरेंद्र तांबे संघटक विजय गमरे आर पि येलवे जेष्ठ नेते शकर तांबे युवक अध्यक्ष विकास धोत्रे सरचिटणीस प्रा संदीप तांबे रत्नागिरी जिल्हा संपर्क प्रमुख गणेश शिर्के जिल्हा सरचिटणीस जितेंद्र तांबे शहर अध्यक्ष दिपेंद्र जाधव सरचिटणीस सुधीर जाधव केवळ सोनावणे विनय तांबे प्रफुल्ल तांबे श्रीकांत सकपाळ बाळकृष्ण देवळेकर गोपीनाथ जाधव नितेश धोत्रे सतीश तांबे रोशन धोत्रे प्रशांत गमरे सूरज तांबे अमोल पवार विशाल तांबे आदी उपस्थित होते. तसेच लवकरच तालुका स्तरीय कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात येणार आहे असे सकपाळ यांनी सागितले.