बातम्या

कालूस्ते ग्रामस्थांच्या मदतीला धाऊन आले आ.शेखर निकम

पोसरे सबस्टेशन वरून कालुस्ते गावाला वीज पुरवठा आ.निकम यांनी उपलब्ध केला १२ लाखांचा निधी

चिपळूण (ओंकार रेळेकर) अनियमित वीज पुरवठ्याने हैराण झालेल्या कालूस्ते गावातील ग्रामस्थांच्या गेल्या अनेक वर्षांपासूनच्या मागणीला अखेर यश आले आहे. चिपळूण संगमेश्वर विधानसभा मतदार संघाचे आमदार शेखर निकम यांनी पोसरे सबस्टेशन वरून कालुस्ते गावाला वीज पुरवठा मिळण्यासाठी जिल्हा नियोजन फंडातून सुमारे १२ लाखांचा निधी उपलब्ध करून दिला आहे.या कामी सहकार्य करणाऱ्या आ.निकम आणि महावितरणच्या अधिकाऱ्यांचे कालुस्ते पंचक्रोशीतील ग्रामस्थानी विशेष आभार मानले आहेत.

चिपळूण तालुक्यातील कालूस्ते पंचक्रोशी गावांमधील ग्रामस्थ मंडळींनी कालुस्ते गावाला पोसरे सब स्टेशन वरून तात्काळ नियमित वीज पुरवठा करण्यात यावा आणि कालुस्ते ग्रामस्थांची विजेसाठी होत असलेली गैरसोय आणि नुकसान टाळावे अशी मागणी आ.शेखर निकम आणि महावितरण चे कार्यकारी अभियंता श्री.कैलास लवेकर यांच्याकडे प्रत्यक्ष भेटीत केली होती .
या बाबत सविस्तर वृत्त असे की
कालूस्ते गावात गेली अनेक महिने अनियमित आणि कमी होल्टेजने वीज पुरवठा होत आहे , कमी होल्टेज मुळे अनेक घरामधील विद्युत उपकरणे ए.सी यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या परिसरातील मुस्लिम बांधवांना शुक्रवारच्या प्रार्थनेच्या वेळेत ही मशिदीत वीज नसल्यामुळे मोठी गैरसोय होत होती. सध्या पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे दिवसा आणि रात्री विजेअभावी ग्रामस्थांचे अतोनात हाल होत आहेत.चिपळूण शहरातून मुरादपुर सब स्टेशन वरून पेठमाप,गोवळकोट आणि कालुस्ते गावाला वीज पुरवठा होत आहे. मुरादपुर स्टेशन वर खूप भार पडत आहे. पोसरे-भोम सबस्टेशन वरून मालदोली,भोम,भिले, कालुस्ते बुद्रुक येथे वीज पुरवठा होतो.यावर अर्धा देखील लोड नाही त्यामुळे येथून कालुस्ते गावाला वीजपुरवठा व्हावा अशी ग्रामस्थ मंडळींची मुख्य मागणी आहे. काही महिन्यांपूर्वी जमातूल मुस्लिम सखरोलमोहल्ला सचिव आयुब मोहम्मद परकार, नायक सचिव मसूद शफी परकार, अब्दुल रज्जाक परकार मोहम्मद गपूर परकार , आरीफ परकार उमर परकार माजी सरपंच लतिफ परकार, अब्दुल रौउफ परकार यांनी या बाबत महावितरणचे कार्यकारी अभियंता कैलास लवेकर यांना भेटून वस्तुस्थिती सांगितली होती. कालुस्ते गावातील गेले अनेक विजेची समस्या भेडसावत होती अनेक वर्ष पोसरे सबस्टेशनवरुन कालुस्ते गावाला विजे पुरवठा करावा अशी मागणी होती गावातील ग्रामस्थ यांनी आमदार शेखर निकम यांच्याकडे सदर प्रश्न मार्गी लागण्यासाठी मागणी केली ग्रामस्थाच्या मागणी विचार करून आ. निकम यांनी तात्काळ या कामात लक्ष देऊन पोसरे सबस्टेशन येथून विज पुरवठयासाठी जिल्हा नियोजन मधून १२ लाखाचा निधी मंजूर करून दिला. तसेच गावातील अन्य विकास कामांना
निधी दिल्याबद्दल कालुस्ते पंचक्रोशी मधील ग्रामस्थ मंडळी यांनी सोमवारी प्रत्यक्ष भेटून चिपळूण संगमेश्वर विधानसभा मतदार संघाचे आमदार शेखर निकम यांचे आभार मानले. यावेळी हुसेन अब्बास परकार, अहमद अब्दुल गफार परकार, अब्दुल लतीफ हसन परकार, मेहमूद उमेर परकार, गुलाम अब्दुल कादिर परकार, अब्दुल रज्जाक इस्माईल, उमर सुर्वे, सज्जिद अब्दुल रज्जाक परकार, मुश्ताक अली सुर्वे ,नुर बिजले आदी मान्यवर उपस्थित होते.

फोटो : पोसरे सबस्टेशन येथून विज पुरवठासाठी निधी मंजूर केल्याबद्द
कालुस्ते ग्रामस्थ यांनी सोमवारी आ.निकम यांचे आभार मानले या वेळी
हुसेन अब्बास परकार, अहमद अब्दुल गफार परकार, अब्दुल लतीफ हसन परकार, मेहमूद उमेर परकार, गुलाम अब्दुल कादिर परकार, अब्दुल रज्जाक इस्माईल, उमर सुर्वे, सज्जिद अब्दुल रज्जाक परकार, मुश्ताक अली सुर्वे ,नुर बिजले आदी मान्यवर उपस्थित होते (छाया : ओंकार रेळेकर).

जाहिरात…

What's your reaction?

Related Posts

1 of 291

Leave A Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!