लांजा – (प्रमोद तरळ) तालुक्यातील वेरवली पंचक्रोशी शिक्षण मंडळ संचलित श्री राम विद्यालय व तु. पुं. शेट्ये कनिष्ठ महाविद्यालय, तथा का. रा. कोळवणकर यामाहा ट्रेनिंग स्कूल या प्रशालेत दि २९/११/२०२३ रोजी नाट्य प्रशिक्षण शिबिर संपन्न झाले या कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ. गांगण मॅडम यांनी केले सुत्रसंचालन श्री. बंडगर सर यांनी केले. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे श्री. डॉ. भगवान नारकर हे लाभले. व कार्य क्रमांकाचे उदघाटन संस्थेचे सचिव मा. श्री पडवणकर गुरूजी यांचे हस्ते नारळ वाढवून करण्यात आले.
विद्यार्थ्यांना मार्गदर्शन डॉ. नारकर व संस्थेचे संचालक मा. अमोल रेडिज यांनी केले. या नाट्य प्रशिक्षण शिबीर यशस्वी करण्यासाठी माजी विद्यार्थी व विद्यमान संचालक श्री शैलेश डोळस व संस्थेचे अध्यक्ष मारूती डोळस ऊर्फ (दादा डोळस) तसेच सर्व संचालक मंडळाचे सहकार्य लाभले तसेच सर्व शिक्षक व सर्व कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभले या नाट्य शिबीराचे वेगळे वैशिष्ट्ये म्हणजे सर्व विद्यार्थी खिळून ठेवले ते डॉ. भगवान नारकर सर व श्री अमोल जी रेडिज सरांनी श्री सचिन कांबळे सरांनी सर्वांचे आभार मानले व कार्यक्रमाची सांगता झाली.