बातम्या

भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून कुवारबाव येथे आधार कार्ड अपडेट व दाखले शिबिर संपन्न..

रत्नागिरी : रत्नागिरी कुवारबाव येथे भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आधार कार्ड अपडेट करणे व वेगवेगळे दाखले देण्यासाठी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. शिबिरामध्ये आधार कार्ड नवीन काढणे, इलेक्शन कार्ड काढणे, पॅन कार्ड काढणे, आधार कार्ड वरील नाव दुरुस्ती, जन्मतारीख दुरुस्ती, यासाठी यूआयडीआय ने ठरवून दिलेल्या दरपत्रकानुसार शुल्क आकारून हे शिबिर घेण्यात आले. शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी आधार कार्ड, पॅन कार्ड आणि त्यातील अपडेट मजकूर महत्त्वाचा असतो त्यामुळे अनेकांना त्याचा लाभ घेता येत नाही या गोष्टी लक्षात घेता या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
या शिबिराचा लाभ कुवारबाव, कारवांचीवाडी, रविंद्र नगर आदी परिसरातील परिसरातील शेकडो लोकांनी घेतला. या शिबिराचे आयोजन भारतीय जनता पार्टी महिला जिल्हा उपाध्यक्ष सौ. प्रियल प्रशांत जोशी यांच्या माध्यमातून करण्यात आले होते. यावेळी भारतीय जनता पार्टीच्या महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष सौ सुजाताताई साळवी, जिल्हा सरचिटणीस सतीशजी नलावडे, तालुका युवा मोर्चा अध्यक्ष संकेत कदम, शहर भाजप चिटणीस रमाकांत आयरे, धीरज कराळकर आदी उपस्थित होते. दखल न्यूज महाराष्ट्र.

What's your reaction?

Related Posts

1 of 295

Leave A Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!