बातम्या

श्री राम विद्यालय वेरवली.बु.|| येथे नाट्य प्रशिक्षण शिबिर उत्साहात संपन्न..

लांजा – (प्रमोद तरळ) विद्यार्थ्यांच्या उपजत कलागुणांना वाव मिळावा आणि त्यांच्या मधल्या अभिनय कौशल्याना संधी मिळून त्यांची ओळख व्हावी यासाठी वेरवली बु|| प्रशालेत प्रसिद्ध सिनेमा अभिनेते दिग्दर्शक श्री डॉ भगवान नारकर सर व नाट्य व चित्रपट दिग्दर्शक व उत्तम अभिनेते लेखक श्री अमोल रिडिज सर यांचा मार्गदर्शकखाली नाट्यप्रशिक्षण शिबिर संपन्न झाले. माता सरस्वतीच्या प्रतिमेसमोर दिप प्रज्वलन करून व नटराजाच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात झाली या कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ.गांगण मॅडम यांनी केले. कार्यक्रमाचे उद्घाटन संस्थेचे सचिव मा.श्री.पडवणकर सर यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले.श्री पडवणकर सर यांनी आपल्या भाषणात अभिनय ,नेपथ्य यांची माहिती दिली.आपला अनुभव सांगताना ते म्हणाले एका नाटकात दोन मिनिटांचा अभिनयासाठी सहा महिने सराव केला.
डॉ.नारकर सर यांनी मार्गदर्शन करताना अभिनयातील बारकावे समजून सांगताना विद्यार्थी मंत्रमुग्ध झाले होते.नाट्य शिबिरात विद्यार्थ्यांना अभिनय ,संवादफेक, नेपथ्य,दिग्दर्शन आणि अभिनय याच्या विविध छटा याची माहिती देण्यात आली.डॉ .नारकर यांनी सकाळ सत्रात हास्याचे विविध प्रकार त्यात नवनीत हास्य ,धनुष्यबाण हास्य व टाळ्याचे विविध प्रकार,डोळ्यांचे व्यायाम,जिभेचे व्यायाम ,मानेचे व्यायाम , गालाचे व्यायाम असे अनेक व्यायामाचे प्रकार अभिनयातून दाखवले .हास्यतून अभिनय कला समजण्यासाठी शिक्षकांना व मुलांना स्टेज वर बोलावून अभिनय करून घेतला .तसेच त्यानी चांगल्या निवडक मुलांना बक्षिसे दिली . मुक अभिनय करून व दिलीप प्रभावळकर यांची भूमिका करून मुलानं खिळवून ठेवले. तसेच नऊ रस मुलाना अभिनयातून समजावून सांगितले . करूण रस साकारताना पाहून मुले भाऊक झाली
दुपारच्या सत्रात दिग्दर्शक श्री अमोल रेडीज यांनी शिक्षकांना व विद्यार्थांना रंगमंचावर उभे राहताना आपले स्थान कसे असावे ,तसेच निरीक्षण शक्ती कशी असावी कायिक ,वाचिक, अंगिक अभिनयाचे प्रकार सांगितले तसेच रेडीज सरांनी. प्रत्येक वर्गातील मुलांकडून एक एक विषय देऊन सांघिक अभिनय करून घेतला. व मुलांचा उस्फूर्त प्रतिसाद मिळाला.नंतर रेडीज सरांनी मुलांना तुम्हाला एकांकिका (नाटिका ) बसवायची असेल तर मी मार्गदर्शन करेन असे आश्वासन दिले
व नंतर “वेडा वृंदावन “या एकपात्री प्रयोगाची पार्श्वभूमी सांगून अभिनय करून दाखवला तेव्हा मुले एकाग्र व भावनिक होऊन अभिनय बघत होती
अशा प्रकारे नाट्य शिबिर यशस्वी करण्यासाठी माझी विद्यार्थी व विद्यमान संचालक श्री शैलेश ,डोळस अध्यक्ष मारुती डोळस उर्फ (दादा) व शिक्षक सर्व कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभले.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री बंडगर सर यांनी आपल्या ओघवत्या वाणीने केले. डॉ नारकर सर व श्री रेडीज सर यांचे श्री सचिन कांबळे सरांनी सर्वांचे आभार मानले. व कार्यक्रमाची सांगता केली. दखल न्यूज महाराष्ट्र।

What's your reaction?

Related Posts

1 of 295

Leave A Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!