गोरेगाव – (प्रमोद तरळ) दि. २६ नोव्हेंबर २०२३ रोजी भारतीय संविधान दिननिमित्त आरे कॉलनी, गोरेगाव इथे विविध सामाजिक संघटनांच्या वतीने संविधान परिचय रलीचे आयोजन मर्जी ( मेरे अधिकार, मेरी जिम्मेदारी ) या संघटनेने केले होते. या रॅली मध्ये विविध सामाजिक संघटनांनी, सामाजिक कार्यकर्ते, स्थानिक नागरिक, बालकांनी सहभाग दर्शविला. प्राध्यापक जालिंदर अडसुळे, माजी पोलिस अधिकारी रघुनाथ महाले, प्राध्यापक हणमंत वानोले, ब्राईट फ्युचरचे प्रमुख किशोर पालवे, ॲड अभिजित सावंत, मर्जी संघटनेचे प्रमुख मंगेश सोनावणे यांनी उपस्थिती दाखवली होती.
या रॅली ची सुरुवात युनिट ३२ येथील जेतवन बुद्ध विहार समोरून सुरू झाली. आणि युनिट ५ ला समारोप झाला. या रॅली मध्ये संविधानाच्या परिचयाचे पथनाट्य सादरीकरण करून जनजागृती केली. तसेच संविधान जागृती गीत सादरीकरण करण्यात आले. उपस्थित मान्यवरांनी संविधान दिनाचे महत्त्व,मूल्य, अधिकार, कर्तव्य आणि दैनंदिन जीवनातील संविधानाची महती अशा विविध विषयावर मार्गदर्शन केले.
नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्य मार्फत मुंबई उपनगर संघटीका दिशा कळंबे यांनी बॅनर आणि पोस्टर प्रदर्शन करून रॅली मध्ये सहभाग दाखविला. मर्जी संघटनेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शिस्तबद्ध नियोजनाची जबाबदारी स्थानिक कार्यकर्ते चंद्रशेखर जाधव,वंदना झेवियर्स, तुषार ढीवरे, दिनेश रमण यांनी उत्तम रित्या पार पाडली. समन्वयक विवेक साळवी यांनी उपस्थितांचे आभार मानले. उपस्थितांना चहा, बिस्कीट आणि अल्पोहाराची व्यवस्था करण्यात आली होती.कार्यालयीन सचिव राकेश तुळसणकर, प्राप्ती कोळी, सागरिका,यांनी रॅलीची पूर्व तयारी उत्तम रित्या केली होती. उपस्थित मान्यवरांचे आभार प्रदर्शन करून युनिट ५ येथे रॅली ची सांगता करण्यात आली.