बातम्या

रिपब्लिकन पार्टी चे राज्यस्तरीय अधिवेशन ७ जानेवारीला चंद्रपूरात

विजय शेडमाके.
२/१२/२०२३
गडचिरोली

गडचिरोली:- रिपब्लिकन पार्टी चे राज्यस्तरीय अधिवेशन दि. ७ जानेवारी २०२४ ला प्रियदर्शनी लॉन चंद्रपूर येथे आयोजन करावयाचे ठरविण्यात आल्यामुळे रिपब्लिकन पार्टी जिल्हा चंद्रपूर च्या कार्यकारणीची बैठकीत रिपाईचे प्रदेश अध्यक्ष प्रकाश कुंभे नागपूर यांच्या अध्यक्षतेखाली व मार्गदर्शनाखाली रेस्ट हाऊस चंद्रपूर येथे पार पडली. सदर राज्यस्तरीय अधिवेशनात रिपब्लिकन पार्टीचे राष्ट्रीय सरचिटणीस डॉ. राजेद्र गवई , राष्ट्रीय अध्यक्ष एस.के. राजेद्रन कर्नाटक , गडचिरोली चे जिल्हाध्यक्ष तथा माजी जि.प. सदस्य अँड. राम मेश्राम यांची प्रमुख उपस्थितीतीत राहणार असुन मार्गदर्शन लाभणार असल्याची माहीती प्रकाश कुंभे यांनी दिली. सदर बैठकीला रिपब्लिकन पार्टी जिल्हा चंद्रपूर चे अध्यक्ष गोपालजी रायपूरे , नागपूर प्रदेश सरचिटणीस शिध्दार्थ सुमन , रिपाईचे जेष्ठ नेते नामदेवराव पिंपळे ,महासचिव मोरेश्वर चंदनखेडे , जिल्हा कोषाधक्ष गुरुदास रामटेके ‘ जिल्हा उपाध्यक्ष गोपाल रामटेके , कोरपना तालुकाध्यक्ष ईश्वर पडवेकर , महिला आघाडी अध्यक्षा लिनता जुनधरे , सचिव डि.डी. खोबागडे चंद्रपूर, राजुरा तालुकाध्यक्ष शामसुंदर मेश्राम , बंल्लारसा तालुकाध्यक्ष अजय चव्हाण , सावली तालुकाध्यक्ष किशोर उंदिरवाडे , भद्रावती तालुकाध्यक्ष संतोष रामटेके , वरोरा तालुकाध्यक्ष अनिल वानखेडे , चंद्रपूर तालुकाध्यक्ष संजय खोब्रागडे, बम्हपुरी तालुकाध्यक्ष विजय रामटेके , शिंदेवाही तालुकाध्यक्ष राजकुमार रामटेके , चिमुर तालुकाध्यक्ष अँड. जनदेव मुन , नंदाबाई रामटेके ,डॉ. दिपा चंहादे , प्रियंका चव्हाण , अपेक्षा पिंपळे ‘ अनुसया रायपूरे आदिची उपस्थिती होती.

What's your reaction?

Related Posts

1 of 295

Leave A Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!