राजापूर – (प्रमोद तरळ) शहराजवळील कोंढेतड गाडगीळवाडी महापुरुष ठिकाण ते गणेश विसर्जन घाट या कच्चा रस्त्याचे खडीकरण व डांबरीकरण व्हावे म्हणून कोंढेतडचे माजी उपसरपंच आणि भाजप युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष अरविंद लांजेकर यांच्या मागणीला यश आले असून माजी कॄषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या प्रयत्नातून ग्रामविकास मंत्री यांच्याकडून पाच लाख रुपये निधी मंजूर झाला आहे
सदर रस्त्याचे खडीकरण व डांबरीकरण व्हावे ही ग्रामस्थांची मागणी लक्षात घेऊन कोंढेतडचे माजी उपसरपंच आणि भाजप युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष अरविंद लांजेकर यांनी शासन दरबारी केलेला पत्रव्यवहार आणि पाठपुरावा त्याला माजी कॄषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांचे स्वीय सहाय्यक व तुळसवडेचे सुपुत्र आदिनाथ कपाळे यांच्या साथीने राज्याचे ग्रामविकास मंत्री श्री महाजन यांनी पाच लाख रुपयाचा निधी मंजूर केला आहे. या रस्त्याच्या भूमीपूजनाच्या कार्यक्रमाचा शुभारंभ नुकताच माजी मंत्री सदाभाऊ खोत यांचे स्वीय सहाय्यक आदिनाथ कपाळे,भाजपचे जिल्हा सरचिटणीस रविंद्र नागरेकर, तालुकाध्यक्ष सुरेश गुरव, भास्कर सुतार, युवा मोर्चा तालुकाध्यक्ष अरविंद लांजेकर, महिला आघाडी तालुकाध्यक्षा सुयोगा जठार, सरपंच मनाली तुळसावडेकर यांच्या हस्ते श्रीफळ फोडून करण्यात आला
यावेळी कोंढेतडचे उपसरपंच श्री वारांगे, माजी उपसरपंच सुभाष नवाळे, रविकांत भामत, प्रकाश शिंदे, रामचंद्र कुवळेकर, निखिल कोठारकर, रमेश वालेकर, रमेश लांजेकर, प्रमोद लांजेकर, संदीप लांजेकर,गणपत लांजेकर, अजिंक्य पावसकर, जितेंद्र तुळसावडेकर, दामोदर गाडगीळ, नंदीनी नवाळे, विठ्ठल भामत, अर्जुन घाणेकर, जयवंत लांजेकर, महेश मणचेकर, वंदना कोठारे,सारिका कोठारे, मिनाक्षी पवार,सरीता तावडे, विभावरी मणचेकर, नंदीनी नवाळे, उदय लांजेकर,नरेश लांजेकर, प्रमोद लांजेकर,माजी नगरसेविका शीतल पटेल, मिनाक्षी नार्वेकर,संपदा जोईल, साक्षी नवाळे, रुपेश कोतरे, निलेश कोतरे, जगन्नाथ साईल, रामचंद्र कुवळेकर, तुळसवडेचे उपसरपंच संजय कपाळे ठेकेदार डीएम चव्हाण यांच्यासह मोठ्या संख्येने कोंढेतडवासिय ग्रामस्थ उपस्थित होते. दखल न्यूज महाराष्ट्र.