राजापूर – (प्रमोद तरळ) नुतन विद्यामंदिर आणि ज्युनिअर कॉलेज ओणी मधील २००३-२००४ च्या बारावीच्या विद्यार्थ्यांनी तब्बल २० वर्षांनंतर एकत्र येऊन आपलं छोटेखानी स्नेहसंमेलन मोठ्या उत्साहात नुकतेच पनवेल येथे आई फार्महाऊसमध्ये पार पडलं,
या स्नेहसंमेलनात वर्गातील स्वर्गीय मित्रांना आदरांजली वाहून दिवसाची सुरुवात करण्यात आली असून विविध ठिकाणी वास्तव्यास असलेले बहुतेक मित्र मैत्रिणीं या ठिकाणी उपस्थित होते, दिवसभर फार्महाऊस मधील मौजमस्तीसोबत विचारांची जून्या नव्या आठवणींची देवाणघेवाण करण्यात आली. विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या मित्रांचं कौतुक करत करत यापुढे प्रत्येकाच्या सुखदुःखात सहभागी होऊन प्रत्येक संघर्षाला बळकट करुन सामाजिक कामात पाऊल टाकण्याचा नवा संकल्प सर्वानुमते घेण्यात आला, अशा रीतीने हे स्नेहसंमेलन नसुन एक महोत्सव साजरा केल्याचा सगळ्यांना आनंद झाला.
दखल न्यूज महाराष्ट्र