रत्नागिरी : टेनिस क्रिकेट असोसिएशन ऑफ इंडिया आणि टेनिस क्रिकेट असोसिएशन महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमानाने 02 डिसेंबर ते 05 डिसेंबर 2023 रोजी नाशिक येथे 5 वी सतरा वर्षातील राष्ट्रस्तरीय अजिंक्यपद स्पर्धा संपन्न झाली. या स्पर्धेसाठी रत्नागिरीतील प्रतापराव माने विद्यालय आणी सुमित्रा देसाई कनिष्ठ महाविद्यालय भांबेड, हायस्कूलचा विद्यार्थी ऋषिकेश शुभांगी सुनिल इंदुलकर (हर्दखळे) महाराष्ट्र संघामध्ये खेळत होता. महाराष्ट्र संघासाठी उत्तम गोलंदाजी केली आणि द्वितीय क्रमांक मिळवला. ऋषिकेश ला सहकार्य करणारे अनिल इंदुलकर, सिद्धेश लखन दादा, रुपेश इंदुलकर, समस्त इंदुलकर परिवार, मुख्याध्यापक श्री. मुलाणी सर, क्रीडा शिक्षक श्री. पी. एन. कांबळे सर, श्री चव्हाण सर श्री राठोड सर श्रीमती चव्हाण मॅडम श्री ऋषिकेश बेर्डे सर सर्व शिक्षक कमिटी आणि विद्यार्थी यांनी ऋषिकेश खूप खूप अभिनंदन केलं. तसेच तु. पु.शेट्ये. कनिष्ठ महाविद्यालय लांजा करण पड्यार (इसवली),अभिषेक पड्यार(इसवली)यांनी मुंबई संघाचे प्रतिनिधित्व करत मुंबई संघाला तिसरा क्रमांक मिळवून दिला. यांना सहकार्य करणारे क्रीडा शिक्षक अनिल कांबळे सर, शिल्पा पाठक मॅडम,
विद्या आठवले मॅडम यांनी करण आणि अभिषेक चे खूप खूप अभिनंदन केले. तसेच मुंबई संघाचे कर्णधार पद अर्ष हरचिरकर (देवरूख, आंगवळी) याने भूषवले आणि उत्तम खेळी केली. टेनिस क्रिकेट असोसिएशन रत्नागिरी अध्यक्ष सुमित अनेराव सर, सचिव सिद्धेश गुरव सर, प्रशिक्षक रोशन किरडवकर, महाराष्ट्र वुमन डायरेक्टर धनश्री गिरी, विलास गिरी सर, तसेच सर्वं जिल्ह्यातून विविध क्षेत्रातून मुलांचे अभिनंदन केले जात आहे. ही 5 वी 17 वर्षा आतील राष्ट्रस्तरीय स्पर्धा, टेनिस क्रिकेट असोसिएशन ऑफ इंडिया अध्यक्ष कन्हैया गुज्जर सर, भारतीय सचिव आणि महाराष्ट्र सचिव सौ. मीनाक्षी विलास गिरी यांच्या मार्गदर्शनाखाली मोठ्या उत्साहात आणि आनंदात पार पडली.