दादर – (प्रमोद तरळ) महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६७ व्या महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्त चैत्यभूमीवर येणाऱ्या भीम अनुयायांना मोफत बिस्किट व पाणी वाटप आदर्श मित्र मंडळ अंधेरी यांच्या तर्फे करण्यात आले.
यावेळी ज्येष्ठ साहित्यिक मोहन जाधव ,एलआयसी अधिकारी राजेंद्र आयरे, नेव्ही अधिकारी रमेश बोडके ,पत्रकार शरद बनसोडे उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन सागर ताटे, किरण वैराळे, दर्शन मिसाळ, विजय मिसाळ, दीपक गायकवाड ,गौतम कांबळे आदींनी केले होते.