बृहन्मुंबई महानगर पालिका जी/उत्तर विभागातील अधिकारी आणि कामगारांचे आभार..
मुंबई – (प्रमोद तरळ) विश्वरत्न,भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त ६ डिसेंबर रोजी, संपुर्ण भारत देशातून डॉ. बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी चैत्यभूमी येथे मोठ्या संख्येने अनुयायी येत असतात, आपण लहानपणापासून पहात आहोत चैत्यभूमीवर येणारा हा अनुयायी गरीब अशिक्षित असल्याने आणि त्यांतच महानगरपालिकेची अपूरी सुविधा, यामुळे तीन दिवस चैत्यभूमीवर असल्याने सर्वत्र मोफत मिळालेले भोजन अर्धवट खाऊन जिकडे तिकडे फेकून दिले जात असे, शौचालयाची सोय नसल्याने लोक कुठेही शौचास बसत असत, त्यामुळे स्थानिक उच्चभ्रू सहिवाशी या अनुयायांबदल द्वेष करत असत, हे रहिवाशी ६ डिसेंबरला दादर सोडून चार दिवस अन्य ठिकाणी जात असत, दिवसेंदिवस बदल होत गेला आणि बृहन्मुंबई महानगर पालिका जी/उत्तर विभागाने ६७ व्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त स्वच्छतेचे केलेल्या नियोजनाने दादर मधील रहिवाशांचे तोंड बंद केले, बृहन्मुंबई महानगर पालिका जी/उत्तर विभागाचे विभाग अधिकारी (W.O) सहाय्यक आयुक्त श्री. प्रशांत सपकाळे यांनी सहाय्यक अभियंता, दुय्यम अभियंता सहायक मुख्य पर्यवेक्षक, पर्यवेक्षक, कनिष्ठ पर्यवेक्षक, मुकादम, कामगार तसेच स्वयंसेवी संस्था यांना घेऊन नियोजनबद्ध पद्धतीने केलेल्या स्वच्छतेचे सर्वत्र कौतुक केले जात आहे, रस्त्यावर कुठेही कचरा दिसत नव्हता एवढी स्वच्छता चैत्यभूमीच्या परिसरात ह्यांनी ठेवली होती, दुसऱ्या दिवशी ७ डिसेंबरला संपूर्ण परिसर व रस्ते पाण्याने स्वच्छ धुवून सुगंधी द्रव्यांची फवारणी करण्यात आली, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी लाखो अनुयायी चैत्यभूमीवर दाखल झाले होते, बृहन्मुंबई महानगर पालिका जी/उत्तर विभागाने ३ डिसेंबर ते ७ डिसेंबर पर्यंत अतीशय शिस्तबद्ध नियोजन करून विश्वरत्न, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना खरी आदरांजली वाहिली, यामुळे महानगरपालिका जी/उत्तर विभागातील सर्व अधिकारी आणि कर्मचारी यांचे कौतुक आणि अभिनंदन करण्यात येत आहे…