बातम्या

नाटे, राजवाडी ग्रामपंचायतीचे पेट्रोकेमिकल झोन,क्रूड ऑइल टर्मिनल विरोधाचे ठराव.

निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सुर्यवंशी यांना ग्रामस्थांचे निवेदन.

राजापूर- (प्रमोद तरळ)
दि. ७ डिसेंबर २०२३ रोजी. साखरी नाटे व राजवाडी येथील ग्रामस्थांनी निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी यांना भेटून रिफायनरी व क्रूड ऑइल टर्मिनल विरोधाचे ठराव दिले.
साखरी नाटे मच्छिमार सहकारी सोसायटी व साखरी नाटे महिला मच्छि व्यावसायिक सहकारी सोसायटी यांच्याबरोबर राजवाडी ग्रामसभेने रिफायनरी , पेट्रोकेमिकल झोन , क्रूड ऑइल टर्मिनल , बंदर , सिंगल पॉईंट मुरिंग आदी आंबोळगड – तिवरे किनारी नको असे ठराव केले होते.
बारसु- सोलगाव येथील ग्रामस्थांच्या खांद्याला खांदा लावून यापुढे रिफायनरी व पेट्रोकेमिकल प्रकल्पाविरोधात संघर्ष करण्याचेही या ग्रामस्थांचे ठरले आहे.
‌यावेळी माजिदभाई गोवळकर , कारीमभाई फणसोपकर , मूहिद भाई खादू , नंदकुमार हळदणकर , मुबारक गैबी , सिकंदर हतवडकर , सिराज बांदिवडेकर , सीद्देश सातूर्डेकर व सलीम सोलकर उपस्थित होते.
जैतापूर अणुऊर्जा प्रकल्प विरोधी आंदोलन गाजविणारे साखरी नाटे गाव आता रिफायनरी विरोधी आंदोलनात सक्रिय झाल्याने प्रशासनाची डोकेदुखी वाढली आहे.
बारसु- सोलगाव पंचक्रोशी व नाणार परिसर याच्या जोडीने किनारपट्टीची गावे आंदोलनात सक्रिय झाल्याने यापुढे मोठे रिफायनरी विरोधात रणकंदन पहावयास मिळणार आहे.
नाटे ,साखरी नाटे , आंबोळगड , राजवाडी ही गावे रिफायनरी प्रकल्पग्रस्त आहेत. या गावांतील ग्रामस्थांनी नाटे परिसर रिफायनरी विरोधी संघटना स्थापन केली असून लवकरच या संघटनेतर्फे आंदोलनाची हाक देण्यात येईल.
स्थानिक ग्रामस्थ यांचा विनाशकारी प्रकल्प याना ठाम विरोध असताना सरकार मात्र स्थानिक शेतकरी ग्रामस्थ यांच्याशी चर्चा करायला तयार नाही अशी शोकांतिका नाराजी व्यक्त केली जात आहे.सरकार आमचे म्हणने कधी तरी ऐकेल या आशेवर शेतकरी स्थानिक ग्रामस्थ ठाम विरोध करतआहेत.सरकारने स्थानिक ग्रामस्थ शेतकरी यांचे म्हणने ऐकले नाही तर आंदोलन तीव्र करण्याचा इशारा ग्रामस्थ यांनी दिला आहे. दखल न्यूज महाराष्ट्र.

What's your reaction?

Related Posts

1 of 291

Leave A Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!