बातम्या

अपरांत हॉस्पिटल येथिल सांधेदुखी, अस्थिविकार या मोफत तपासणी शिबिरास अस्थिरुग्णांचा भरघोस प्रतिसाद..

चिपळूण (ओंकार रेळेकर)अपरांत हॉस्पिटल येथे दिनांक ७ डिसेंबर पासून ..२३ डिसेंबर या कालावधीत आयोजित सांधेदुखी अस्थीविकार या मोफत तपासणी शिबिराचा आज शुभारंभ झाला. सदर शिबिराची वेळ सकाळी दहा ते दोन व सायंकाळी पाच ते आठ असून अपरांत हॉस्पिटलचे अनुभवी अस्थिरोग तज्ञ व जॉईंट रिप्लेसमेंट सर्जन डॉ.श्रीश भास्करवार उपरनिर्देशित वेळेत रुग्ण तपासणार आहेत. शिबिराचे उद्घाटन अपरांत हॉस्पिटलचे एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर डॉ. अब्बास जबले आणि डॉ.श्रीश भास्कर वार यांचे द्वारे करण्यात आले.

अपरांत हॉस्पिटलचे सी.एम.डी डॉ. यतीन जाधव यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून शिबिराचा श्रीगणेशा करण्यात आला. कोकणातील नागरिकांसाठी अल्प खर्चामध्ये जास्तीत जास्त गुणवत्तापूर्ण उपचार उत्तमोत्तम वैद्यकीय तज्ज्ञांकडून घडावेत यासाठी अपरांत सदैव प्रयत्नशील राहील अशी निर्धार वजा ग्वाही डॉ जाधव यांनी याप्रसंगी दिली.
शिबिरार्थी म्हणून उपस्थित एका ज्येष्ठ नागरिकांद्वारे डॉ.श्रीश भास्करवार यांचा पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. अपरांत हॉस्पिटलचे एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर डॉ. शेखर पालकर, डॉ अब्बास जबले, डॉ सदगुरू पाटणकर, लेडी सर्जन डॉ भक्ती रेडीज, फिजिशियन डॉ. हर्षद होन रेडिओलॉजिस्ट डॉ. सचिन विधाते, पॅथॉलॉजिस्ट डॉ. सुरज शिकलगार या मान्यवरांसोबत एच.आर श्री.तानाजी शिंदे
मेडिकल कॉर्डिनेटर डॉ.रजनीश रेडीज,डॉ.प्रसाद गडकरी, डॉ राजू वर्मा यांची उपस्थिती लाभली.
तज्ञ अनुभवी डॉक्टर भास्करवार यांच्याद्वारे सल्ला व मार्गदर्शन मोफत
बोनडेन्सिटोमेट्री (हाडाचा ठिसूळपणा) ही तपासणी, 50 टक्के दरातील एक्स-रे, सवलतीच्या दरात उपचार यामुळे हे शिबिर वैशिष्ट्यपूर्ण ठरले असून, नागरिकांनी याचा लाभ घेण्यासाठी८०८७१९८५३३,७९९८७३७३७३ या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन हॉस्पिटल प्रशासनाकडून करण्यात येत आहे.

फोटो : शिबिराचे उद्घानप्रसंगी डॉ. अब्बास जबले,डॉ.यतीन जाधव आणि मान्यवर छायाचित्रात दिसत आहे(छाया : ओंकार रेळेकर)

What's your reaction?

Related Posts

1 of 291

Leave A Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!