मुंबई – (प्रमोद तरळ) रविवार दि. २४ डिसेंबर २०२३ रोजी सायंकाळी ६ वाजता रामेश्वर विद्यामंदिर, गावदेवी, सांताक्रूझ पूर्व, मुंबई – ४०००५५ येथे समाजबांधवांच्या उपस्थितीत अखिल महाराष्ट्र कुणबी सेवा संघ शाखा वांद्रे खार सांताक्रूझ शाखेचा सन २०२४ दिनदर्शिका प्रकाशन सोहळा थाटामाटात पार पडला.
या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून संघाच्या मा. महिला अध्यक्षा सौ. मंगलाताई मोंडे, मालाड शाखेचे अध्यक्ष श्री. बळीराम कामतेकर साहेब, विलेपार्ले शाखेचे मा. अध्यक्ष श्री. कुवळेकर साहेब उपस्थित होते. तसेच शाखेचे सर्व पदाधिकारी, समाजबांधव, बंधू भगिनी यांची मोठ्या संख्येने उपस्थिती लाभली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाखेचे अध्यक्ष श्री. संतोषजी जोगले यांनी केले.