महाजन वाडी , झरीविनायक मित्र मंडळ आयोजित भव्य रास नारळ टिकवणे स्पर्धेचे उदघाटन युवा नेते मिहीर माने व भाजपचे तालुका अध्यक्ष दादा दळी यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले. यावेळी बोलताना दादा दळी यांनी सांगितले की दिनांक 12 जानेवारी ते 25 जानेवारी मध्ये संपन्न होणाऱ्या नमो चषक या अनेक मैदानी वा इनडोअर आऊटडोअर खेळामध्ये तसेच सांस्कृतिक स्पर्धे मध्ये मोठ्या संख्येने भाग घ्या. भाजपा नेते बाळासाहेब माने नेहमी तालुक्यातील प्रत्येक खेळाडूला प्रोत्साहित करत असतात. त्यांच्या पाठीशी खंभीर पणे उभे राहा.
ही स्पर्धा भाजपा चा बूथ अध्यक्ष उदित नार्वेकर यांच्या पुढाकाराने संपन्न झाली तर या स्पर्धे साठी माजी सरपंच पराग भाटकर, उपसरपंच राजेश पाटील, पप्या भाटकर, रवी भाटकर, संजोग भाटकर, योगेश भाटकर, महेश भाटकर, संकेत भाटकर, स्वरूप भाटकर, सोहम भाटकर, यश पडवलकर, यश भाटकर, आदी उपस्थित होते.