राजापूर – (प्रमोद तरळ)
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे पक्षप्रमुख सन्मा. उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार, शिवसेना नेते तथा रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभेचे खासदार सन्मा. विनायकजी राऊत तसेच शिवसेना उपनेते तथा राजापूर लांजा साखरपा विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉ राजनजी साळवी यांच्या सुचनेनुसार, रत्नागिरी जिल्हा ओबीसी सेलचे अध्यक्ष श्री पांडुरंगजी उपळकर यांच्या मार्गदर्शनाखाली त्त्यांच्या समवेत विधानसभा समन्वयक श्री प्रकाशजी कुवळेकर, शिवसेना राजापूर तालूका संपर्क प्रमुख श्री अनिलजी भोवड यांनी राजापूर तालुक्यातील जिल्हा परिषद गट तसेच पंचायत समिती गण वार शिवसेनेचे विभाग प्रमुख उपविभाग प्रमुख यांच्या समवेत प्रत्येक गाववार ओबीसी संपर्क अभियान यशस्वीपणे पार पाडले व त्याला तालुक्यातील ओबीसी बांधवानी भरभरन प्रतिसाद दिला. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने रबविण्यात आलेल्या ओबीसी जनजागृतीला सर्व ओबीसी बांधवानी उदंड प्रतिसाद देऊन या उपक्रमाचे मनःपूर्वक स्वागत केले व सर्वच ओबीसी बांधवानी याबद्दल आभार व्यक्त केले.
संपर्क दौरा यशस्वीरित्या व नियोजनबद्द पार पडल्याबद्दल शिवसेनेच्या सर्व विभागातील विभाग प्रमुख उपविभाग प्रमुख, शाखा प्रमुख, शिवसेनेचे सर्व कार्यकर्ते तसेच बहुसंख्येने उपस्थित राहिलेल्या सर्वच ओबीसी बांधवांचे आभार मानण्यात आले