सामाजिक कार्यकर्ते अजित गोरुलेसह स्थानिक आणि मुंबईकर ग्रामस्थांची मागणी….
संगमेश्वर – (प्रमोद तरळ) तालुक्यातील गेली कित्येक वर्ष बोंडये आणि कासार कोळवण गावाला जोडणाऱ्या रस्त्याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होते , आता रस्त्याच्या दुतर्फा खडी ठेवलेली आहे. दोन्ही गांवातील मुंबईकर आणि स्थानिक ग्रामस्थ यांनी प्रशासनाकडे आणि स्थानिक लोकप्रतिनिधिंकडे सदर रस्ता होळी पूर्वी करावा असा आग्रह केलेला आहे . जर होळीनंतर काम चालू झाले तर सदर रस्ता पूर्णत्वास नेणे अशक्य होईल. ग्रामीण भागातील असे अनेक रस्ते आहेत जे निधी अभावी अर्धवट डांबरीकरण किंवा केवळ खडीकरण झालेले आहे. लोकप्रिय आमदार श्री शेखर निकम साहेब यांच्या अथक प्रयत्नातून सदर रस्त्याच्या कामाचे उदघाट्न २०२१ पासून झालेले आहे मध्यंतरी कोरोना त्यामुळे डांबरीकरण होऊ शकले नव्हते ते आता होळी पूर्वी व्हावे हिच अपेक्षा नागरिक करत आहेत. जर हा रस्ता झाला तर साखरपा आणि देवरुखला जाण्यासाठी अनेक गावांना याचा फायदा होईल..