बातम्या

ओझर शाळा नं.१ अमृत महोत्सव वर्षानिमित्त प्रश्नमंजुषा स्पर्धेत कारवली केंद्र प्रथम…

राजापूर – (प्रमोद तरळ) ओझर नं.१ शाळेच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त गुरुवारी १४ डिसेंबर २०२३ घेण्यात आलेल्या प्रश्न मंजुषा स्पर्धेत कारवली केंद्र, ओझर केंद्र, गोठणे दोनीवडे केंद्र यांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक पटकावले. पाचल व ओणी बिट मर्यादित घेण्यात आलेल्या या स्पर्धेत ७ केंद्रानी सहभाग नोंदवाला होता. नासा /इस्रो परीक्षेच्या अभ्यासक्रमावर आधारित ही स्पर्धा एकूण ५ फेऱ्यामध्ये घेण्यात आली. साईश सुहास दोरूगडे, श्रेया श्रीधर चव्हाण (कारवली केंद्र ) दिया मंगेश गुरव, विराज योगेश नवलू (ओझर केंद्र ) जस्लीन फैयाज हाजू, गौरी प्रसन्न सुर्वे (गोठणे-दोनीवडे ) यांनी आपापल्या केंद्राचे प्रतिनिधित्व करून यश संपादन केले. प्रश्न मंजुषा स्पर्धेसारखी बुद्धीला चालना देणारी स्पर्धा आयोजित करून ओझर शाळेने खूप स्तुत्य उपक्रम घेतल्याबद्दल श्री भास्कर गुरसाळे सर. यांनी गौरवोद्गार व्यक्त केले. या प्रसंगी उपस्थित शिक्षक बँकेचे नूतन संचालक श्री. विजय खांडेकर यांनी बहुमोल मार्गदर्शन केले.उदघाटन कार्यक्रम प्रसंगी गावचे सरपंच श्री. विकासजी रेगे, ग्रामपंचायत सदस्य श्री. जहिरजि टोले, अंगणवाडी सेविका सौ. मानसी गुरव,कबड्डी असोसिएशनचे उपाध्यक्ष श्री. सत्यवान कुवळेकर, श्री. पाटील सर, नाईक सर, शाळेचे माजी शिक्षक श्री.सुतार सर, श्री. कोसंबे सर, श्री. पांचाळ सर, श्री. मांजरे सर, श्री. चौगुले सर व पालक, ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते.
‌‌प्रश्नमंजुषा स्पर्धेची सुरुवात भारताचे माजी राष्ट्रपती मिसाईल मॅन डॉ. ए. पि. जे. अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. या कार्यक्रम प्रसंगी यावर्षी नासासाठी पात्र झालेल्या जस्लीन फैयाज हाजू हिचा गौरव करण्यात आला. तसेच इस्रो साठी पात्र झालेल्या शालिनी तेरवणकर हिचा गौरव करण्यात आला. तसेच नितांत संचालक श्री. विजय बाळू खांडेकर यांचाही सन्मान करण्यात आला.स्पर्धेत सहभागी सर्व ग्रुपमधील विद्यार्थ्यांना सहभागी प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. दत्तात्रय गायकवाड सर यांनी केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. श्री. विकासजी रेगे, मा. श्री. जहिरजी टोले, शिक्षक वृंद, पालक, ग्रामस्थ व विद्यार्थी यांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

What's your reaction?

Related Posts

1 of 295

Leave A Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!