शाळा, हायस्कूलच्या विद्यार्थ्यांच्या मदतनिधीसाठी क्रिकेट स्पर्धेचे आयोजन…
राजापूर – (प्रमोद तरळ) तालुक्यातील मौजे तारळ, चौके गावातील प्राथमिक शाळा व हायस्कूलच्या मुलांचा शैक्षणिक उत्कर्ष करण्याच्या एका उदात्त हेतुने तारळ – चौके गावातील तरुण वर्ग मोठ्या संखेने एकत्रित आले आहेत. “माझी शाळा माजी जबाबदारी”.. असा उपक्रम राबवत माजी विद्यार्थी चळवळ अध्यक्ष श्री.विलास रा.मुळम, उपाध्यक्ष श्री. रमाकांत के. तिर्लोटकर , सेक्रेटरी श्री. स्वप्निल रा. वाघधरे, खजिनदार श्री. एकनाथ प्र. मुळम , सर्व सहकारी, सर्व सल्लागार आणि कार्यकारणी,व माजी विद्यार्थ्यांच्या वतीने ७ जानेवारी २०२४ रोजी डॉ.बाबासाहेब आंबेडकर मैदान मोतीलाल नगर ,गोरेगाव (पुर्व ) येथे एक भव्यदिव्य माजी विध्यार्थी चषक २०२४ पर्व – २ क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.या स्पर्धेचे स्वरूप आकर्षक चषक स्वरूपात असणार या स्पर्धेत प्रथम क्रमांकास आणि द्वितीय क्रमांकास आकर्षक चषक देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.या स्पर्धेतून जमा होणारा निधी गावातील शाळा व हायस्कूलच्या मुलांच्या शैक्षणिक उत्कर्षासाठी वापरण्यात येणार असून तारळ – चौके गावातील तरुण वर्गाचे कौतुक करावे तितके कमीच आहे.