लांजा – (प्रमोद तरळ) तालुक्यातील वेरवली पंचक्रोशी शिक्षण मंडळ संचलित श्री राम विद्यालय व तु.पु.शेटे कनिष्ठ महविद्यालय व का.रा.कोळवणकर यामाहा ट्रेनिंग स्कूल मध्ये वार्षिक पारितोषिक वितरण व वार्षिक स्नेहसंमेलन समारंभ अतिशय उत्साहात संपन्न झाला
दि २९ डिसेंबर २०२३ रोजी वार्षिक पारितोषिक वितरण समारंभात संस्थेचे अध्यक्ष मारुती (दादा)डोळस ,शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष मा. श्री .अमोल रेडीज सर,संचालक वेरवली पंचक्रोशी व माजी विद्यार्थी मा. श्री. मनीष कोकाटे ,संचालक वेरवली पंचक्रोशी व माजी विद्यार्थी मा.श्री शैलेश डोळस प्रशालेच्या मुख्याध्यापिका सौ गांगण मॅडम व शिक्षक वृंद व पालक, ग्रापंचायत सदस्य आदी उपस्थित होते.
शालेय जीवनात अभ्यासासोबत विद्यार्थ्याचा शारीरिक, मानसिक | भावनीक असा सर्वागीण विकास व्हावा यासाठी शालेय व आंतरशालेय स्तरावर विविध स्पर्धा व नाविन्यपूर्ण अशा उपक्रमाचे व कार्यक्रमाचे आयोजन होत असते. त्यात विद्यार्थी मोठ्या आनंदाने व उत्साहाने सहभागी होतात. व आपल्या अंगभूत कलागुणाचे प्रदर्शन करतान व स्पर्धांमध्ये
यश मिळवतात, अशा यशस्वी विद्यार्थांचे यशाचे कौतुक व्हावे व त्यातून इतर विद्यार्थांना प्रेरणा मिळावी यासाठी वार्षिक पारितोषिकवितरण समारंभ प्रेरणादायी असतात
कार्यक्रमाची सुरुवात अध्यक्ष मा.श्री दादा डोळस यानी सरस्वतीच्या प्रतिमेसमोर दिपप्रज्वलनाने केली. संचालक मा .श्रीशैलश डोळस यानी प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला
कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्रशालेतील मुलींनी स्वागतगीत सादर केले .प्रास्ताविक शाळेच्या मुख्याध्यापका सौ.गांगण मॅडम यांनी केले .त्यानंतर बौध्दिक क्षेत्रात चमकणारे विद्यार्थी पाचवी ते दहावी प्रथम क्रमांक पटकावलेले विद्यार्थी, A.T, M.L.T इंग्रजी प्रथम , हिंदी मध्ये प्रथम येणारे विद्यार्थ्याना बक्षिसे व प्रमाणपत्र देवून सन्मानित करण्यात आले .
विद्यालयाचे ज्येष्ठ शिक्षक श्री डोळे सर यांनी दोन महत्त्वाची बक्षिसे जाहीर केली. आदर्श विद्यार्थी हा बहुमान मिळाला इयता दहावीत शिकणारा शुभम आदेश जाधव व नववीत शिकणारी तन्वी संतोष मेस्त्री हिने पटकावला.
त्यानंतर सांस्कृतिक क्षेत्रात चमकणारे विद्यार्थी यामध्ये, निबंध, कथाकथन, वक्तृत्व, काव्यवाचन गणितीय, चित्रकला, गणितीय रांगोळी,
पाककला
स्पर्धा यामध्ये प्रथम, द्वितीय, तृतीय, उत्तेजनार्थ विदयार्थ्याना प्रमाणपत्र देवून गौरवण्यात आले.
नंतर क्रीडा क्षेत्रात उत्तम कामगिरी करणारे विद्यार्थी शालेय स्तरावर तालुका स्तर,जिल्हास्तर व विभाग स्तरावर झळकणारे विद्यार्थ्यांना प्रमाण पत्र देवून सन्मानित केले तसेच, धावणे, चालणे, रिले, बॉल थ्रो, गोळाफेक, क्रिकेट संघ, कबड्डी संघ, अडथळा शर्यत यामध्ये विजेत्या स्पर्धकाला प्रमाणपत्र देवून गौरवण्यातआले नंतर मा. श्री अमोल रेडीज सर यानी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. अध्यक्ष माननीय श्री .दादा डोळस यानी मुलांचे कौतुक केले. उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री लाड सर यानी आपल्या ओघवत्या वाणीनी केले .सर्व संस्थाचालक, विद्यार्थी, शिक्षक, पालक , बक्षीस दाते याचे आभार श्री बंडगर सर यानी मानले व कार्यक्रमाची सांगता केली. दि .30 डिसेंबर 2023 रोजी वार्षिक स्नेहसंमेलन समारंभ पार पाडला. या कार्यक्रमाचे उदघाटन अध्यक्ष माननीय श्री दादा डोळस यांच्या हस्ते दिपप्रज्वलन व माता सरस्वती व नटराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार संस्थेचे सचिव मा श्री पडवणकर यानी अर्पण केला. त्यावेळी व्यासपिठावर अनेक मान्यवर संस्थाचालक , संचालक मा.श्री शैलेश डोळस श्री अमोल रेडीज, मा श्री मनीष कोकाटे आदी मान्यवर, संस्था प्रतिनिधी, शालेय समिती अधयक्ष, सदस्य ,शिक्षकपालक संघ, व्यवस्थापन समिती, सदस्य ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच, सदय आदि मान्यवर उपस्थित होते. या मान्यवरांना शालश्रीफळ देऊन सन्मानित करण्यात आले. अनेक गुणवंत विद्याथी, खेळाडू, मॅरेथॉनमध्ये उज्ज्वल यश संपादन करणारा निलेश कुळये याचा शाल श्रीफळ देवून सन्मान करण्यान आला शाळेच्या मुख्याध्यापिका यानी प्रास्ताविकामध्ये शालेय अनेक उपक्रमाचा गुणवंत विदयार्थी ,शिक्षक, शाळेची प्रगती या बद्दल मत मांडून सगळ्याचे अभिनंदन केले. नंतर श्री सचिन कांबळे सर यानी वर्षभरात जे जे उपक्रम राबविले जातात, बक्षीसपात्र विद्यार्थी, विविध स्पर्धा हे सर्व चित्रफितीच्या माध्यमातून
धावता आढावा घेतला, नंतर विविध गुणदर्शनाच्या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी लोक नृत्य , कोळी नृत्य, दिप नृत्य, जाखडी नृत्य , एकपात्री प्रयोग आदी सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले .यामध्ये पालकाचा, ग्रामस्थांचा उदंड प्रतिसाद मिळाला. सूत्रसंचालन शालेय विद्यार्थीनी सलोनी जाधव,स्नेहल करळकर यानी केले. तसेच श्री बंडगर सर, श्री डोळे सर यानीही सूत्रसंचालन करणाऱ्या मुलींना मार्गदर्शन करून सहकार्य केले. श्री सचिन कांबळे सर यांनी बक्षिसदात्याची व पालकांकडून बक्षिसे स्वीकारून त्यांना प्रोत्साहित केले. आलेले ग्रामस्थ,पालक ,मान्यवर सगळ्यांचे आभार मा.श्री.डोळे सर यांनी मानले व कार्यक्रमाची सांगता केली.