मुंबई – (प्रमोद तरळ)
त्रिरत्न बौद्ध महासंघ चुनाभट्टी मुंबई यांच्या विद्यमाने संपन्न झालेल्या धम्ममित्र समारंभच्या वेळी कुमारी.अनुष्का शिरसाठ हिने धम्मदिक्षा घेऊन मरणोत्तर आपल्या आईचे स्वप्न पुर्ण केलं आहे.कलकथित आई मीना शिरसाठ या देखील आपले घर,नोकरी सांभाळून समाजसेवेसाठी वेळ देत असतं.त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवत त्यांच्या दोन नंबर मुलीने सुद्धा धम्ममित्र बनून आपल्या समाजासाठी कार्य करण्याचा निर्णय घेतला आणि आपल्या मुलीने धम्ममित्र बनावे हे आईचे स्वप्न पूर्ण केले.
आई जगणाच्या आधार , जीवनाचा आधार होता. “स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी” म्हणी प्रमाणे आईचे छत्र हरपले असताना जीवनात घर, शिक्षण सांभाळत असताना समाजकार्य करण्याचे व्रत घेतले आहे. आणि हाच आईचा वारसा पूढे चालवणार असे मत अनुष्काने व्यक्त केले.
सिद्धार्थ गौतमाच्या शिकवणीवर आधारित, ज्याला बुद्ध म्हणतात , बौद्ध धर्म दुःखापासून आणि पुनर्जन्माच्या चक्रातून सुटका: निर्वाण प्राप्ती हे आपले ध्येय मानतो. हे ध्यान आणि काही नैतिक नियमांचे पालन करण्यावर भर देते. याच नियमांचे पालन करण्याहेतू ह्या वेळ जवळ जवळ आठ अनुयायींनी दिक्षा घेतली त्या मध्ये अनुष्का ही दीक्षा घेणारी सर्वात लहान मुलगी आहे. ह्यावेळी उपास्थित सर्व धम्मचारी, धम्मचारिणी आणि उपस्थित मान्यवर यांनी शुभाशीर्वाद देऊन पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.