विजय शेडमाके.
दिं.१९ फेब्रुवारी २०२४
गडचिरोली : हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवरायांची जयंती आज (सोमवारी) गडचिरोली शहरासह जिल्हाभर मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यानिमित्त विविध ठिकाणच्या शिवजयंती कार्यक्रमांना खासदार अशोक नेते यांनी उपस्थिती दर्शवून शिवप्रेमींचा उत्साह वाढविला.
येथील महिला महाविद्यालय परिसरातील व इ़ंदिरा गांधी चौकात, तसेच वाकडी या विविध ठिकाणी खासदार अशोक नेते यांनी शिवजयंतीनिमित्त आयोजित सोहळ्यास उपस्थित राहून शिवरायांच्या प्रतिमेचे पुजन व पुष्पार्पण करून आदरांजली वाहिली.
याप्रसंगी खासदार नेते यांनी अल्पोपहार आलुभाताचे वाटप करत छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा मुद्रित असलेल्या टि-शर्टचे वाटप केले. वाकडी येथे शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्यात येणार आहे. शिवजयंतीचे औचित्य साधून खा.नेते यांच्या हस्ते भूमिपूजन करून या पुतळा उभारणीच्या कामाला सुरूवात करण्यात आली.
यावेळी सहयोगी शिवभक्त जगन्नाथ पाटील बोरकुटे, डॉ.मिलिंद नरोटे स्पंदन फाउंडेशन, युवामोर्चा चे जिल्हाअध्यक्ष अनिल तिडके, आशिष रोहनकर जिल्हा महामंत्री, आशिष कोडापे जिल्हा महामंत्री,बंडू झाडे ता.महामंत्री निखिल चरडे, शहर अध्यक्ष विशाल हरडे, विद्यार्थी प्रमुख स्वप्निल अडेटवार, डॉक्टर सेल चे डॉ रौनक फेबुलवार, साई सिलामवर, अनिल जैन, टायगर ग्रुप चे दीपक भासारकर, अंकुश कुडावले, ऋषिकेश बारापात्रे, अंकुश पवार,निखिल खामानकर.वाकडी चे रवि पाटील बोरकुटे, देवेंद्र पाटील वाकडे (पोलिस पाटील), यशवंत पाटील झरकर,प्रभाकर पाटिल मंगर, वसंत बोरकुटे, चरणदास बोरकुटे, देवराव पाल,बाबुराव मानकर, दिवाकर चौधरी,डंबाजी राऊत, माणिक महाराज बांगरे, तानाजी लडके, ऋषिजी भोयर, दिलीप नागपुरे, शिव साम्राज्य कला व क्रीडा मंडळ वाकडी,गडचिरोली शिवभक्त आणि समस्त गावकरी मंडळी उपस्थित होते.
आष्टी येथे शिवजन्मोत्सव साजरा व रॅलीत खासदार अशोकजी नेते यांची उपस्थिती..
.
आष्टी या ठिकाणी शिव जन्मोत्सव साजरा करून भव्य दिव्य रॅली आयोजित केली होती.
यात खासदार अशोक नेते यांनी या शिव जयंतीनिमित्त सोहळ्यास उपस्थित राहून शिवरायांच्या प्रतिमेचे पुजन व पुष्पार्पण करून आदरांजली वाहिली.तसेच शिव जन्मोत्सव सोहळा निमित्ताने चौकात रॅलीचे आगमन झाले असता याप्रसंगी आष्टी चौकातील असलेल्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला खासदार अशोक नेते यांनी माल्यार्पण करून अभिवादन केले.
यावेळी लोकसभा विस्तारक बाबुराव कोहळे,भाजपा पदाधिकारी संजय पंदिलवार, विठ्ठल आवारी,पांडे जी,अनिल ओल्लालवार, तसेच मोठ्या संख्येने शिवभक्त उपस्थित होते.