बातम्या

कोकण रेल्वे प्रवासी सेवा संघ ठाणे आयोजित शिवजयंती उत्सव ठाणे रेल्वे फलाट ७/८ वर उत्साहात साजरा…..

ठाणे – (प्रमोद तरळ) सुमारे ४०० वर्षाच्या इतिहासातील महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांची दैदित्यमान किर्ती आजतागायत अबाधित आहे. आजच्या वर्तमान काळातही तसेच भविष्यात ही कणभरही कमी न होता महाराजांची प्रतिमा त्यांचे कार्य उजळतच राहील. दिनांक १९ फेब्रुवारी इ.स.१६३० शिवबाचा जन्म. याच निमित्ताने कोकण रेल्वे प्रवासी सेवा संघ (रजि) ठाणे संघटनेचे प्रमुख सल्लागार श्री राजू कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली, छत्रपती शिवाजी महाराजांचा ३९४ वा जयंती उत्सव ठाणे रेल्वे स्थानक फलाट क्रमांक ७/८ वर छोटेखानी उत्साहाने साजरा करण्यात आला. त्याप्रसंगी संघटने प्रमुख यांसह सचिव- दर्शन कासले, परेश गुरव, खजिनदार- संभाजी ताम्हणकर, अंहित- प्रसन्ना पावसकर, सल्लागार- यशवंत बावदाणे, सभासद प्रमुख- सुहास तोडणकर, विकास कांबळे, सदस्य- दर्शन शेट्ये, अनंत लोके, प्रमोद जाग, अमित चव्हाण, नामदेव चव्हाण, वेदांत सावंत, अजय आदी आवर्जून उपस्थित होते.

What's your reaction?

Related Posts

1 of 291

Leave A Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!