मुंबई – (प्रमोद तरळ) मुचकुंदी परिसर विकास संघाचा ७ वा वर्धापनदिन सोहळा व स्नेहसंमेलन रविवार दि. २५ फेब्रुवारी २०२४ रोजी स. ९ ते ४ या वेळेत मराठी ग्रंथ संग्रहालय दादर (पू) मुंबई येथे मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे
मुचकुंदी परिसर विकास संघ ही संस्था गेली ७ वर्षे लांजा, राजापूर तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी झटत आहे शैक्षणिक समस्या असो वा आरोग्य विषयक प्रश्न असो ते प्रश्न सोडविण्यात मुचकुंदी परिसर विकास संघाला सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे यश आले आहे.
सदर स्नेहसंमेलनात मान्यवरांचे स्वागत, कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेचा प्रवास (यशोगाथा), विविध सन्मान सोहळे, शिलेदार पुरस्कार, सांस्कृतिक कार्यक्रम (विविध कलाविष्कार), समाजप्रबोधनपर व्याख्यान, महिलांसाठी हळदीकुंकू आदी भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे कौटुंबिक जिव्हाळ्याच्या, सामाजिक बांधिलकीच्या सोहळ्याला लांजा राजापूर तालुक्यातील जनतेने आवर्जून उपस्थित रहावे असे आवाहन मुचकुंदी परिवाराकडून करण्यात आले आहे