रामस्तुतीवर केलेले कथक नृत्य ठरले विशेष आकर्षण
खेड – (प्रमोद तरळ) माघी गणेशोत्सवाच्या निमित्ताने पंधरागाव विभागातील धामनंद शिंदेवाडी गेली अनेक वर्षे भव्य रेकॉर्ड डान्स स्पर्धा आयोजित करते.. या स्पर्धेत एकूण तीस स्पर्धक सहभागी झाले होते.सदर स्पर्धेत कावळे गावातील सिद्धी चाळके हिने सहभाग घेतला होता.तरी या स्पर्धेत तिने कथक नृत्य सादर करून तृतीय क्रमांक पटकावला.तिच्या नृत्यातील “रामस्तुती” आणि कथकमुद्रा विशेष आकर्षण ठरल्या.ती चिपळूण येथील नृत्यमल्हार कथक अकादमी मध्ये तिच्या गुरू नृत्यालंकार सौ. आर्या परेश चितळे यांच्याकडे कथक ची साधना करते..आपल्या यशाचं श्रेय ती तिच्या गुरूंना देते…कोणतीही कला अथवा विद्या आत्मसात करायची असेल तर आपल्या गुरूंचे आपल्या जीवनात फार महत्व आहे.मला माझ्या या प्रवासात गुरू म्हणून लाभलेल्या नृत्यालंकार सौ.आर्या परेश चितळे ह्या माझी प्रेरणा आहेत असे मनोगत तिने व्यक्त केले.. सदर स्पर्धेचे परीक्षण. विश्व समता कला भूषण पुरस्कार विजेते शाहीर शाहिद खेरटकर यांनी केले होते