मुंबई – (प्रमोद तरळ) सहयाद्री कुणबी संघ पुणे शहर(महाराष्ट्र)-खेड दापोली चिपळूण संगमेश्वर तालुका आयोजित सहयाद्री प्रीमिअर लीग २०२४ या क्रिकेट स्पर्धेचे कळवा पठणी मैदान मुंबई ठिकाणी आयोजन. करण्यात आले आहे
सहयाद्री कुणबी संघ गेली कित्येक वर्ष आपल्या सामाजिक कार्याची ठसा उमटवत आहे,नुसते शहरा ठिकाणी मर्यादित न राहता या संघाने आता खेडे गावात आपली पाऊले टाकण्याचा छोटासा प्रयत्न करत आहे…काही गावांमध्ये अशी निरागस विद्यार्थी विध्यार्थीनी आहेत की ज्यांना शिक्षण करण्याची ईच्छा आहे परंतु आपली परिस्थिती साथ देत नाही अश्या विद्यार्थ्यांना आपले शिक्षण पूर्ण करता यावे म्हणून सहयाद्रीच्या शिलेदारांनी त्या निरागस मुलांना दत्तक घेऊन त्यांचा १ ली ते १० वी पर्यंतचा शिक्षणाचा संपुर्ण खर्च करण्याची जबाबदारी हाती घेतली आहे,त्यासाठी या क्रिकेटच्या स्पर्धेचे आयोजन २५ फेब्रुवारी २०२४ रोजी कळवा पठणी मैदान मुंबई या ठिकाणी केले आहे…या स्पर्धेसाठी मुलांसाठी अनेक दानशूर व्यक्तींनी मोलाचे सहकार्य केले आहे सर्व खेड दापोली चिपळूण संगमेश्वर मधील सहयाद्रीच्या शिलेदारांचे आभार आहेत.