खेड : खेड तालुक्यातील आंबये गावचे सुपूत्र कु.पंकज काताळे (उत्कृष्ट गायक, संगीतकार) आणि कु.प्रणव काताळे (उत्कृष्ट संगीतकार) म्हणून दापोली खेड मंडणगड विधानसभेचे आमदार मा.श्री. योगेशदादा कदम यांच्या हस्ते कु.पंकज काताळे व कु.प्रणव काताळे उत्कृष्ट गायक व उत्कृष्ट संगीतकार म्हणून सन्मान करण्यात आला.कु.पंकज काताळे यांची साई समर्थ रेकॉडिंग स्टुडिओ या युट्यूब चॅनलवर १७ गाणी प्रसारीत झाली आहेत.त्यातील तीन महत्वाची गाणी आहेत.१) नाचत ये रे गणा गौरीच्या नंदना(सन २०२१),२)हे गणा अतुरली ही धरती आज सारी(सन-२०२२),३)वाट किती पाहू रे गणा (सन २०२३) या तीन वर्षात गणपती लालबागच्या राजा मुंबई,श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती पुणे या ठिकाणी तिन्ही गाण्यांना उत्तम प्रतिसाद मिळाला.हार्मोनियम,कीबोर्ड,कॅशिवो हे त्याचे आवडते वाद्य आहे.पंकज काताळे यांनी भजन, कीर्तन,भारूड,नमन,ऑर्केस्ट्रा, भक्तिगीते,लोकगीते,समाजप्रबोधन,कोकणची लोककला शक्तीतूरा कार्यक्रम आणि इतर सर्वाना उत्कृष्ट संगीतकार म्हणून संगीत देत असतात.
कु.प्रणव काताळे याने कलर्स मराठी व सूर नवा ध्यास नवा या कार्यक्रमात गायन केले आहे.आमच्या कोळीवऱ्याची शान (लोकगीत) व दर्शन दयावे रणी तू मला (गणपतीचे गाणं)युट्यूबवर खूपच गाजत आहेत.ड्रमसेट, ऑक्टोपॅड हे त्याचे वाद्य आहे.कु.प्रणव काताळे याने भजन,किर्तन,भारूड,नमन,ऑर्केस्ट्रा,लोकगीते,भक्तिगीते, समाजप्रबोधन आणि कोकणची लोककला शक्तीतूरा कार्यक्रम मध्ये संगीतकार म्हणून संगीत देत असतात.पनवेल रायगड येथे नुकताच त्याने श्री रामगाथा श्रुश्राव्य मराठी गाणी व अभंगगाथा कार्यक्रमात राष्ट्रीय पुरस्कार विजेती सुप्रसिद्ध सिनेनाट्य गायकी सावणी रवींद्र ,सुर नवा ध्यास नवा फेम सुप्रसिद्ध गायक जयदीप बगवाडकर दापोली येथील कार्यक्रमात गौरव महाराष्ट्राचा विजेता नचिकेत देसाई व सा रे ग म प विजेती सौं.केतकी भावे यांच्या कार्यक्रमात प्रणव काताळे ड्रमसेट व ऑक्टोपॅड वाजविले. दखल न्यूज महाराष्ट्र