माहिती अधिकार महासंघाचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना पत्र.
समिर शिरवडकर -प्रतिनिधी.
रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यातील कार्यरत मे.जे.एस.डब्लू र्पोर्ट बद्द्ल जयगड पंचक्रोशी बचाव कृती समिती मु.पो.जयगड,ता.जि. रत्नागिरी यांनी दि.१६-०६-२२ रोजी नमुद विषयी की,जे.एस.डब्लू पोर्ट मधून उडणारे क्लिंकर डस्ट पावडर व इतर रसायन त्वरित थांबवून त्यावर कडक कायदेशीर कारवाई करून कायमस्वरूपी बंदी घालावी.अश्या आशयाची तक्रार मा. जिल्हाधिकारी ,मा.सह. बंदर निरीक्षक, महाराष्ट्र मेरिटाईम बोर्ड,बंदर अधिकारी रत्नागिरी,तसेच अन्य विभागाला,दि.१६-०६-२२ रोजी देण्यात आली होती.त्याचबरोबर प्रदूषणकारी आणि मानवी जीवनाला हानिकारक पावडर ज्या वेळी उडुन लोकांच्या घरात, अंगानातं, अंगावर,किव्हा हवेत पसरली/पडली त्या वेळींचे फ़ोटो सहित म्हणजेच दि.०६-०६-२२ चे फोटो त्या तक्रारी सोबत जोडले आहेत.
सदर, विषयी महाराष्ट्र मेरिटाईम बोर्ड कडुन संमधीत व्यवस्थापणाला ग्रामस्थांच्या तक्रारी अनुषंगाने हजर राहण्यासाठी दि.२५-०६-२२ रोजी सांगितले. परंतू ज्यानी ही तक्रार दिली त्यांना आपल्या विभागाकडून उपस्थित रहाण्यासाठी सांगितले नाही किव्हा तसा पत्रव्यवहार केला नाही.अस का?.तक्रारदाराला कोणतीही पूर्वकल्पना न देता आपण तक्रार अर्ज निकाली काढला.आणि संमधीत व्यवस्थापणाला वाचविण्यासाठी प्रयत्न केले.क्लिंकर डस्ट पावडर या मालाची हाताळणी दि.१२-०६-२२ पासून आज तागायत केली नसल्याचे पत्र व्यवस्थापणाने बंदर अधिकारी यांना दि.१२-०७-२२ रोजी दिले.त्यानंतर आपल्या महाराष्ट्र सागरी मंडळ यांनी दिलेल्या अटी/शर्ती, परवानग्या सहित जुन १२-०६-२२ पासून सदर मालाची हताळणी झाली
नसलेचा दि.१४-०७-२२ अहवाल देऊन तक्रार निकाली काढली होता.
परंतू,क्लिंकर डस्ट पावडर जून २०२२ मध्ये कस्टम EDI डेटा नुसार समनधित जे.एस.डब्लू पोर्ट कडे आल्याचे दि.१०-०१-२४ च्या पत्रानुसार म्हटले आहे.मग प्रादेशिक बंदर अधिकारी यांनी दिलेला अहवाल चुकीचा आहे का? त्याचप्रमाणे जेव्हा ही पावडर हवेत उडाली त्या दिवशीचे फोटो पाहता, सदर माल आल्याचे आणि अहवाल चुकीच्या पद्धतीने दिल्याचे समजते. तरी याबाबत योग्य ती कार्यवाही करून प्रदूषण करणाऱ्या जे.एस. डब्लू. कंपनीला पाठीशी घालणाऱ्या अधिकाऱ्यांची चौकशी करून त्वरित कार्यवाही आपल्या स्थानावरून करून,वरील तक्रारी अनुषंगाने प्रदूषण होणाऱ्या मालाची ने-आन कायमस्वरूपी बंद करावी. असे या पत्रात नमूद केले आहे.
दरम्यान,वरील पत्राबाबत महाराष्ट्र सागरी मंडळ ( मुख्य कार्यलाय) विचारणा केली असता लवकरच कारवाही करणार असल्याचे महाराष्ट्र सागरी मंडळाचे सन्मा. प्रदीप बडये यांनी दैनिक चालू वार्ता शी बोलताना सांगितले.