मा.ग्रामपंचायत सदस्या सौ.अनुजा राकेश दांडेकर यांच्या पाठपुराव्याला यश
समिर शिरवडकर-प्रतिनिधी
जैतापूर :- माननीय आमदार डॉ. श्री राजनजी साळवी साहेब यांच्या शिफारसी नुसार महाराष्ट्र सागरी मंडळ मार्फत जैतापूर मधीलवाडी दांडेकर तरबंदर येथील जेटी दुरुस्त करणे,तब्बल १९ लक्ष २० हजार कार्यारंभ आदेश जारी झाला या कामाचे भूमिपूजन समारंभ सोमवार दिनांक ११.०३.२४ रोजी सकाळी ११.०० वाजता मधील वाडी येथील दांडेकर तरबंदर येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला. जैतापूर सरपंच श्री राजप्रसाद राऊत, श्री देव वेताळ मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष श्री प्रकाश मांजरेकर, जेष्ठ ग्रामस्थ श्री प्रभाकर भाटकर, जेष्ठ ग्रामस्थ श्री सुभाष दांडेकर , शाखाप्रमुख श्री श्रीकृष्ण राऊत यांच्या शुभहस्ते श्रीफळ वाढवून भूमिपूजन करण्यात आले, यावेळी मेरीटाईम बोर्डचे डेप्युटी इंजिनिअर श्री भूषण करगुटकर, ग्राम पंचायत सदस्य श्री रुपेश करगुटकर,श्री सिकंदर करगुटकर,सौ आराध्या मांजरेकर, शाखाप्रमुख श्री प्रसाद करगुटकर, युवासेना तालुका समन्वयक श्री प्रसाद माजरेकर ,युवासेना उपविभाग समन्वयक श्री स्वप्नील सोगम, माजी ग्रामपंचायत सदस्या सौ अनुजा दांडेकर,माजी ग्रामपंचायत सदस्य श्री सर्फराज काझी, शिवसहकार सेनेचे उपजिल्हा प्रमुख श्री समीर शिरवडकर, गटप्रमुख श्री सुनील करगुटकर, ग्रामसेवक पीटलेकर भाऊ,जेष्ठ ग्रामस्थ रत्नदीप पवार उपस्थित होते
या विकास कामासाठी प्रामुख्याने पाठपुरावा सौ.अनुजा दांडेकर आणि श्री राकेश दांडेकर यांनी केला होता आणि जैतापूरचे सुपुत्र व मेरीटाईम बोर्डचे डेप्युटी इंजिनिअर श्री भूषण करगुटकर यांनी विशेष प्रयत्न केल्यामुळे ग्रामस्थ त्यांचे आभार मानले.
या प्रसंगी परेश भाटकर, समीर पावसकर, रतन पवार, संजय सुर्वे, ओंकार पाटील , गीता पाटील प्रणाली मांजरेकर, स्मिता दांडेकर,पल्लवी भाटकर, स्नेहल तोंडवळकर, तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित …