बातम्या

चिखलगावचा शंतनू नकाशे बँक करप्टसी लाॅ परिक्षेत प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण…

राजापूर:- (प्रमोद तरळ) तालुक्यातील चिखलगावचे रहिवासी आणि राजापूर – ‌लांजा – संगमेश्वर विधानसभा मतदारसंघाचे उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाचे विधानसभा क्षेत्रप्रमुख अँड चंद्रप्रकाश नकाशे यांचे सुपुत्र शंतनू नकाशे यांने के. सी. लाॅ काॅलेज, चर्चगेट मुंबई येथून बँक करप्टसी लाॅ मध्ये सन २०२२-२३ या शैक्षणिक वर्षात सर्वाधिक गुण मिळवून काॅलेजमध्ये पहिला नंबर पटकावला आहे. त्याला माजी न्यायाधीश अभय ठिपसे यांच्या हस्ते गौरविण्यात आले.
शंतनू हा अरविंद गंडभीर हायस्कूलचा माजी विद्यार्थी आहे. त्याच्या सत्कार प्रसंगी मुंबई युनिव्हर्सिटीच्या कायदा विभागाच्या मुख्य प्राध्यापिका डॉ स्वाती रौतेला, मुख्याध्यापिका डॉ कविता लालचंदानी, व्हाइस प्रिन्सिपॉल डॉ किरण शर्मा आदी उपस्थित होते

What's your reaction?

Related Posts

1 of 295

Leave A Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!