बातम्या

गडचिरोली जिल्हाला सुजलाम् सुफलाम् करण्यासाठी विशेष प्रयत्न करणार.

चामोर्शी येथील सभेत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची ग्वाही

विजय शेडमाके
०५/०४/२०२४
गडचिरोली:-
गडचिरोली : गडचिरोली जिल्हा हा वनसंपत्ती, खनिज संपत्तीने संपन्न आहे, तरीही या जिल्ह्यात गरिबी आणि बेरोजगारी आहे. पण ही गरीबी दूर करण्याचे काम सुरू झाले आहे. अशोक नेते यांनी खासदार म्हणून अनेक कामांसाठी सातत्याने पाठपुरावा केला आहे. हा जिल्हा सर्वच बाबतीत सुजलाम सुफलाम करण्यासाठी विशेष प्रयत्न करणार, अशी ग्वाही केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिली. ते चामोर्शी येथे भारतीय जनता पार्टी- शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी-आरपीआय-पिरीपा महायुतीचे उमेदवार खासदार अशोक नेते यांच्या प्रचारासाठी आयोजित प्रचार सभेत बोलत होते.

या जिल्ह्यातील रस्त्याच्या सोयी, वैद्यकीय सुविधा, पुलांची उभारणी, सिंचनाच्या सोयी, मोबाईल फोनची कनेक्टिव्हिटी, रोजगार अशा सर्वच बाबतीत कामे झपाट्याने सुरू आहेत. त्यामुळे हा जिल्हा समृद्ध, संपन्न महाराष्ट्रातील पाच जिल्ह्यात पहिल्या क्रमांकावर राहील, असा विश्वास देतो. या जिल्ह्याचा सर्वांगीण विकास हाच भारतीय जनता पार्टीचा संकल्प आहे. शेतकरी, शेतमजूर, आदिवासी, ओबीसी यांचे जीवन बदलविण्याकरिता पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदींसाठी ताकद लावून अशोक नेते यांना विजयी करा, असे आवाहन ना.गडकरी यांनी यावेळी केले.

चामोर्शीतील हरडे कृषी महाविद्यालयात आयोजित या प्रचार सभेत अन्न व औषध प्रशासनमंत्री धर्मरावबाबा यांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हात बळकट करण्यासाठी अशोक नेते यांना विजयी करण्याचे आवाहन केले.

महायुतीचे उमेदवार अशोक नेते यांनी आपले मनोगत व्यक्त करताना जगात देशाला नंबर वन करायचे असेल तर पुन्हा एकदा नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील सरकार आणणे गरजेचे आहे असे सांगत गेल्या दहा वर्षात राबविलेल्या कल्याणकारी योजनांबद्दल सांगितले. जिल्ह्यातील रेल्वेमार्गाची मंजुरी, सिंचनाच्या सुविधा, मेडिकल कॉलेज, हवाई धावपट्टी, सुरजागड प्रकल्प आदी कामात माझा मोलाचा वाटा आहे. काँग्रेसचे उमेदवार बाहेरचे पार्सल आहेत. या लोकसभेत त्यांचा कुठलाही संबंध नाही. त्यामुळे विकासाची दृष्टि असलेल्या आणि तुमच्याशी नाळ जुळलेल्या उमेदवाराची निवड करा, असे आवाहन खा.नेते यांनी केले.

या प्रचारसभेच्या सुरुवात करण्यापुर्वी चामोर्शी येथे भाजपाचे युवा नेते स्व.स्वप्निल वरघंटे यांना मान्यवरांनी श्रद्धांजली वाहिली. यावेळी मंचावर आमदार डॉ.देवराव होळी, भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रशांत वाघरे, माजी आमदार डॉ.नामदेव उसेंडी, लोकसभा विस्तारक बाबुराव कोहळे, लोकसभा समन्वयक प्रमोद पिपरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रवींद्र वासेकर, युवा राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष लिलाधर भरडकर, भाजपचे जिल्हा महामंत्री गोविंद सारडा, जिल्हा महामंत्री प्रकाश गेडाम, जिल्हा महामंत्री योगिता पिपरे, किसान आघाडीचे प्रदेश सचिव रमेश भुरसे, महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्ष गिता हिंगे, डॉ.चंदा कोडवते, युवा जिल्हाध्यक्ष अनिल तिडके, किसान आघाडीचे जिल्हाध्यक्ष रमेश बारसागडे, ओबीसी मोर्चाचे जिल्हाध्यक्ष अनिल पोहनकर, जिल्हा उपाध्यक्ष प्रणय खुणे, जिल्हा उपाध्यक्ष अरुण हरडे, रोशनी वरघंटे, तालुकाध्यक्ष आनंद भांडेकर, राष्ट्रवादी काँग्रेसच्या तालुकाध्यक्ष निकू नैताम, शहराध्यक्ष सोपान नैताम, नगरसेवक राहुल नैताम, लौकिक भिवापुरे, दिलीप चलाख, सुरेश शहा, मधुकर भांडेकर, निखील धोडरे, यश गण्यारपवार, तसेच मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.

What's your reaction?

Related Posts

1 of 291

Leave A Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!